किया इंडियाने ८.९९ लाख रुपयांत नवीन किया सिरॉस लाँच केली
मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: किया इंडिया या आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ८.९९ लाख रूपयांपासून सुरू होणाऱ्या आकर्षक किमतीत नवीन किया सिरॉस लाँच करण्यासह मध्यम व कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणींमध्ये नवीन एसयूव्ही सेगमेंट दाखल केला आहे. कंपनीचे प्रीमियम मॉडेल्स ईव्ही९ व कार्निवलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण आहे, जे भारतातील ग्राहकांना अद्वितीय मूल्य तत्त्व देते.
किया इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर श्री. जून्सू चो म्हणाले, “भारतात, विशेषत: वेईकल्सकडून अधिक अपेक्षा करणारे तरूण, तंत्रज्ञानप्रेमी व साहसी ड्रायव्हर्समध्ये एसयूव्हींप्रती मागणी वाढत आहे. या विकसित होत असलेल्या प्राधान्यक्रमांशी बांधील राहत किया इंडिया नाविन्यता आणि ग्राहक-केंद्रित डिझाइनच्या माध्यमातून ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये शक्य असलेल्या मर्यादांना दूर करत आहे. किया सिरॉस आमच्या पोर्टफोलिओमधील भावी उत्क्रांतीला, म्हणजेच एसयूव्हीच्या नवीन प्रजातीला सादर करते, जिच्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान, अपवादात्मक आरामदायीपणा आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे. या वेईकलला वरचढ ठरवणारी बाब म्हणजे इंटीरिअर्समध्ये शाश्वत साहित्याचा वापर करण्यात आला आहे, ज्यामधून हरित भविष्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. असे असताना देखील किया सिरॉस प्रबळ मूल्य तत्त्व, प्रीयिम वैशिष्ट्ये आणि अद्वितीय दर्जा देते, जो भाारतातील आधुनिक ड्रायव्हर्सच्या महत्त्वाकांक्षांची संलग्न आहे.''
अद्वितीय तंत्रज्ञान व स्मार्ट कनेक्टीव्हीटी:
किया सिरॉसमध्ये सेगमेंट-फर्स्ट ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्टम आहे, जी ऑटोमॅटिकली १६ कंट्रोलर्सचे अपडेट करते, ज्यासाठी डिलरशिपला भेट देण्याची गरज नाही. हे इनोव्हेशन सामान्यत: लक्झरी वेईकल्समध्ये दिसून येते.
किया कनेक्ट २.० सिस्टममध्ये ८० हून अधिक वैशिष्ट्यांची व्यापक श्रेणी आहे, जी विनासायास कनेक्टीव्हीटी आणि इंटेलिजण्ट वेईकल मॅनेजमेंटच्या माध्यमातून ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्साहित करते.
तसेच, कियाने किया कनेक्ट डायग्नोसिस (केसीडी) सादर केले आहे, जे वापरकर्त्यांना दूरूनच त्यांच्या वेईकलच्या स्थितीचे मूल्यांकन करण्याची सुविधा देते आणि किया अडवान्स्ड टोटल केअर (केएटीसी) सक्रियपणे ग्राहकांना टायर रिप्लेसमेंट्स व मेन्टेनन्स अशा आवश्यक सर्विसेसबाबत माहिती देते, ज्यामधून विनासायास मालकीहक्काची खात्री मिळते.
प्रीमियम आरामदायीपणा व एैसपैस इंटीरिअर्स:
२,५५० मिमी व्हीलबेससह किया सिरॉस प्रवाशांच्या आरामदायीपणाला प्राधान्य देते. ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपीटप्रमाणे सेवा देते, ज्यामधून विनासायास डिजिटल इंटरफेस मिळते.
प्रमुख आरामदायी वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
• समर्पित ५-इंच क्लायमेट कंट्रोल डिस्प्ले, जे जलदपणे व सहजपणे क्लायमेट सेटिंग्ज देते.
• वायरलेस अॅप्पल कारपले व अँड्रॉईड ऑटोसह सर्वोत्त्म ऑडिओ अनुभवासाठी हार्मन कार्डन प्रीमियम ८-स्पीकर साऊंड सिस्टम.
• रिअर सीट व्हेंटिलेशन, पुढील आसनांपर्यंत आरामदायीपणा.
• स्लायडिंग व रिक्लायनिंग ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स ज्या स्थिर बूट स्पेस आणि सुधारित प्रवासी आरामदायीपणा देतात.
• ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ, जे केबिनमध्ये हवा खेळती राहण्याचा अनुभव देते.
सुरक्षितता व कार्यक्षमता:
किया सिरॉसमध्ये लेव्हल २ अडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स (एडीएएस) आहे, ज्यामध्ये १६ ऑटोनॉमस सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि सर्वसमावेशक २० रॉबस्ट सेफ्टी पॅकेज आहे.
• स्मार्ट क्रूझ कंट्रोलसह स्टॉप अँड गो
• फ्रण्ट कोलिजन वॉर्निंगसह अव्हॉयडण्स असिस्ट
• लेन किप असिस्ट आणि लेन फॉलो असिस्ट
• ३६०-डिग्री कॅमेरासह ब्लाइण्ड व्ह्यू मॉनिटर
• इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रेाल आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल
• सुधारित संरक्षणासाठी सहा एअरबॅग्ज
• एबीएस