हरित उत्पादनांसाठीची बाजारपेठ 'ईकोझार' लॉन्च
मुंबई, ३० जानेवारी २०२५: ईकोझार या हरित उत्पादनांसाठीच्या भारताच्या पहिल्या संपूर्ण इन्टिग्रेटेड मार्केटप्लेसचे अधिकृत लॉन्चिंग करण्यात आले. शाश्वत भविष्याच्या इकोफायच्या व्हिजनमधून जन्मलेला हा प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक वाहने (दुचाकी) आणि रूफटॉप सोलर सिस्टम या दोन ईको-फ्रेंडली सोल्यूशन्सना एकत्र आणतो, जेणेकरून हरित जीवन सुलभ आणि सर्वांसाठी सहजप्राप्य बनावे.
ईकोझारचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे उद्दिष्ट लोकांना केवळ शाश्वततेचा उपदेश देण्याऐवजी विविध हरित उत्पादनांची खरी माहिती प्रदान करण्याचे आहे. हा मंच आर्थिक मूल्य किंवा बचतीबाबत उपभोक्त्यांना शिक्षित करतो आणि त्याच बरोबर गरज, वापर आणि जीवनशैली यांच्या आधारे योग्य उत्पादने देखील सुचवतो. आपल्या उपभोक्त्यांना तो स्मार्ट निवड करण्यासाठी सक्षम बनवतो, मग ते संपूर्ण पेमेंट करून खरेदी केलेल उत्पादन असो, संपूर्ण डिजिटल लोन घेतलेले असो, अल्पावधीसाठी सब्स्क्रिप्शन घेतलेले असो किंवा कटकटी आणि सौदेबाजीशिवायचा एक्स्चेंज असो.
ईकोझारचे सीईओ कार्तिक गुप्ता म्हणाले, “ईकोझार हे केवळ एक मार्केटप्लेस नाही; ही एक चळवळ आहे, जिचा उद्देश प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी शाश्वत जीवनाची नवी व्याख्या करण्याचा आहे. हरित पर्याय गुंतागुंतीचे किंवा महागडे असतात हे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही चंग बांधला आहे. ईकोझारच्या मदतीने ईको-फ्रेंडली निर्णय घेणे – इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेणे असो किंवा रूफटॉप सोलर पॅनल्स इंस्टॉल करणे असो – एक बटण क्लिक करण्याइतके सोपे झाले आहे.”
इलेक्ट्रिक दुचाकींसाठी रेंज आणि क्षमता याविषयी तर रूफटॉप सोलरसाठी हवामान, भूगोल आणि वीज वापर याविषयी बरेच संशोधन करून तयार केलेले हुशार कॅल्क्युलेटर आपल्या उपभोक्त्यांना एक असंदिग्ध, प्रामाणिक आणि सुस्पष्ट आउटपुट देते, ज्याच्या आधारे ते योग्य निवड करू शकतात.
हा प्लॅटफॉर्म त्रास-मुक्त अनुभवासाठी बनवला असून तो मोठ्या उत्पादकांशी आणि स्थानिक भागीदारांशी सहयोग करतो आणि खरेदीचा एक संस्मरणीय अनुभव प्रदान करण्याची खबरदारी घेतो. ईकोझार खरेदीनंतरच्या म्हणजे आरटीओ नोंदणी तसेच सोलर बसवणे इ. शी संबंधित सर्व डॉक्युमेंटेशनमध्ये देखील मदत करतो आणि हरित निवड करण्याचा मार्ग सोपा आणि सुरळीत करतो. प्राप्यतेसाठी वचनबद्ध असलेल्या ईकोझारने लवचिक आर्थिक पर्याय देण्यासाठी आघाडीच्या आर्थिक संस्था आणि विमा प्रदात्यांशी भागीदारी केली आहे. यामध्ये संपूर्ण पेमेंट करणे, सुलभ कर्ज, विमा आणि सब्स्क्रिप्शन मॉडेल्स वगैरे प्लान आहेत.
नजीकच्या भविष्यात प्लॅटफॉर्मवर सहभागी होणाऱ्या एमएसएमईजना कार्यकारी भांडवल, इन्व्हेंटरी फंडिंग इ. सारखे वित्तपुरवठ्याचे सोपे पर्याय प्रदान करण्याचा देखील या प्लॅटफॉर्मचा मानस आहे. असे करून या एमएसएमईजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्रांतीत सहभागी होण्यासाठी सक्षम बनवण्याचे त्यांचे ध्येय आहे.