Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रेडक्लिफ लॅब्जची 'फॉर द विमेन, बाय द विमेन' मोहीम

 रेडक्लिफ लॅब्जची 'फॉर द विमेन, बाय द विमेन' मोहीम

मुंबई, २२ मार्च २०२५: भारतातील ५२% महिलांना जीवनशैलीशी निगडित आजारांचा धोका आहे हे लक्षात घेत निदानात्मक आरोग्यसुविधा पुरविणारी अग्रगण्य कंपनी रेडक्लिफ लॅबने 'फॉर द विमेन, बाय द विमेन' ही महिनाभर चालणारी मोहीम सुरू केली आहे. हा उपक्रम देशभर राबविल्या जाणाऱ्या व संपूर्णत: महिला आरोग्यकर्मींद्वारे व्यवस्थापित २२० हून अधिक आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य देखभालीचा पुरस्कार करण्यास समर्पित आहे, जागरुकता निर्माण होण्यास चालना देणे, लवकरात लवकर निदान करून घेण्यास प्रोत्साहन देणे आणि आपल्या आरोग्याची सूत्रे आपल्या हातात घेण्यासाठी महिलांना सक्षम बनविणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.

रेडक्लिफ लॅब्जची 'फॉर द विमेन, बाय द विमेन' मोहीम २१ राज्यांतील ११० शहरांमध्ये राबवली जाणार आहे. दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, मुंबई, बेंगळुरू आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यात वाराणसी, पटणा, जबलपूर, जयपूर आणि भारताच्या विविध भागांतील अन्य महत्त्वाच्या प्रदेशांचाही यात समावेश असणार आहे.

प्रतिबंधात्मक आरोग्य देखभालीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी व तिचा पुरस्कार करण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करत रेडक्लिफ लॅब्जने ही मोहिमेची आखणी केली आहे. या शिबिरांमध्ये महिलांसाठी संप्रेरकांच्या पातळीशी निगडित आरोग्य अर्थात हार्मोनल हेल्थच्या मोफत तपासणीसह खास स्त्रियांसाठी निवडलेल्या संपूर्ण शरीरासाठीच्या आरोग्य तपासण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही सर्व शिबिरे संपूर्णपणे महिला आरोग्यकर्मी, फ्लेबोटॉमिस्ट्स आणि सहाय्यक कर्मचारीवर्गाद्वारे चालवली जाणार आहेत, जे आरोग्यक्षेत्रातील महिलांची ताकद व चिकाटी यांचे प्रतीक आहे.

रेडक्लिफ लॅब्जचे सीईओ आणि संस्‍थापक आदित्य कांडोई म्हणाले, “५२% महिलांना जीवनशैलीशी निगडित आजारांचा धोका असूनही महिलांच्या आरोग्याकडे फार काळापासून दुर्लक्ष केले जात आहे. थायरॉइड असंतुलन आणि पीसीओएससारख्या हार्मोन्सशी निगडित समस्यांचे बरेचदा निदान होत नाही, तर दुसऱ्या बाजूला डायबेटिस, कार्डिओ-व्हॅस्क्युलर आजार यांच्या रुग्णसंख्येत भर पडत असल्याने महिलांवरील आरोग्यसमस्यांचा ताण अधिकच वाढताना दिसतो. या चिंताजनक बाबींचे वाढते प्रमाण लक्षात घेत आमची “फॉर द विमेन, बाय द विमेन” मोहीम लवकरात लवकर निदान व वेळच्या वेळी वैद्यकीय हस्तक्षेपास पाठबळ पुरविणाऱ्या खास निवडक चाचण्यांची हेल्थ पॅकेजेस देऊ करते, ज्यात मोफत हार्मोनल हेल्थ टेस्ट्सचा समावेश आहे. प्रतिबंधात्मक तपासण्यांचे महत्त्व केवळ समस्यांचे लवकर निदान होण्यापुरते मर्यादित नाही तर महिलांना आपले शरीर अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावे व त्यांनी आपल्या आरोग्याची सूत्रे आपल्या हाती घ्यावीत यासाठी त्यांना सक्षम करणे हा त्यामागचा हेतू आहे. आमच्या समर्पित महिला आरोग्यकर्मींच्या नेतृत्वाखाली राबवली जाणारी ही मोहीम दर्जेदार निदानात्मक सुविधा सहज उपलब्ध करून देण्याच्या व महिलांसाठी सक्रिय आरोग्य व्यवस्थापनाच्या संस्कृतीस चालना देण्याच्या आमच्या ध्येयाला पुन:प्रस्थापित करणारी आहे.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.