Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"स्टार कास्ट - ऍक्टिंग अकॅडमी चा भव्य उद्‌घाटन सोहळा संपन्न"*

 *"स्टार कास्ट - ऍक्टिंग अकॅडमी चा भव्य उद्‌घाटन सोहळा संपन्न"*


रविवार दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एल. जे. ट्रेनिंग सेंटर, दादर पश्चिम, मुंबई येथे *श्री. प्रशांत कडणे* संचालीत "स्टारकास्ट" या अकॅडमीचा उद्‌घाटन सोहळा मुंबईतील प्रसिद्ध हेअर ड्रेसर *श्री. रमेश दादा बोऱ्हाडे* यांच्या शुभ हस्ते पार पडला. श्री. रमेश दादा बोऱ्हाडे यांनी त्याच्या *इरॉज* या शॉप मध्ये मराठी आणि हिंदीतील दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींचे हेअर स्टाईल करून लूक चेंज केलेले आहेत. तसेच संचालक श्री. प्रशांत कडणे यांनी मराठी सिनेमा आणि टेलीव्हिजन इंडस्ट्री मध्ये गेले 3६ वर्षे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनय क्षेत्रात काम केलेले आहे. यांच्या या अनुभवाचा फायदा ऍकटिंग अकॅडमीत प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थाना नक्कीच होईल यात शंका नाही. त्यांच्या या स्टारकास्ट  अकॅडमी मधून प्रत्येक विद्यार्थी एक उत्तम कलाकार घडूनच बाहेर पडेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. हे त्यांनी आवर्जून कार्यक्रमात सांगितले.

 


सदर उद्‌घाटन सोहळ्याला प्रशांत सरांच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी, नातेवाईकानी आणि मित्रमंडळीनी आवर्जुन उपस्थिती लावली. 


सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांची मुलगी भैरवी प्रशांत कडणे आणि त्यांचे माजी विद्यार्थी सोमनाथ सर, स्वप्निल दळवी, तेजस निवळकर, अभिजीत मळीक, विपुल म्हात्रे, सुबोध दळवी, सोनाली बुऱ्हाणपूरकर या सर्वांचा खारीचा वाटा आहे असे प्रशांत सरांनी सांगितले. 


प्रशांत सर यांनी स्टारकास्ट अकॅडमीचे प्रशिक्षण क्लासेस लवकरच मे पर्यंत सुरु करत आहोत अशी त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी घोषणा केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.