कायनेटिक ग्रीनचे जागतिक विस्तारीकरणाचे लक्ष्य; मोबिलिटी अँड इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष म्हणून सुधांशू अग्रवाल यांची नियुक्ती केली
२४ मार्च २०२५: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड या भारताील इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकींच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीला मोबिलिटी अँड इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष म्हणून श्री. सुधांशू अग्रवाल यांच्या नियुक्तीची घोषणा करताना आनंद होत आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये दोन दशकांहून अधिक काळाचा संपन्न अनुभव असलेले श्री. अग्रवाल धोरणात्मक नेतृत्व, व्यवसाय विकास, विस्तारीकरण आणि गतीशीलता सोल्यूशन्समध्ये कुशल आहेत. त्यांची नियुक्ती मोठी उपलब्धी आहे, जेथे ते दोन नवीन उच्च क्षमता असलेली क्षेत्रे - लास्ट माइल सोल्यूशन्सकरिता ईव्हींची निर्यात व तैनातीमध्ये विकासाच्या कंपनीच्या पुढील टप्प्याला चालना देण्यास सज्ज आहेत. भारतातील या दोन्ही क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे, ज्याचे श्रेय भारतामधील झपाट्याने विकसित होत असलेल्या गतीशीलता क्षेत्रातील ईकॉमर्स व क्विक कॉमर्स नेतृत्वित होम डिलिव्हरी सेगमेंटमधील अपवादात्मक वाढीला जाते.
श्री. अग्रवाल महत्त्वाच्या टप्प्यावर कायनेटिक ग्रीनमध्ये सामील झाले आहेत, जेथे कंपनीने विकासाच्या गतीशील टप्प्याला सुरूवात केली आहे. श्री. अग्रवाल यांचे नेतृत्व असलेला विभाग लास्ट-माइल लॉजिस्टिक्स आणि क्विक-कॉमर्स डिलिव्हरीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आघाडीच्या ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स आणि संस्थात्मक कंपन्यांच्या गरजांची पूर्तता होईल. कमी कार्यसंचालन खर्च व शाश्वत फायद्यांमुळे ईव्हींसाठी मागणी वाढत असताना कायनेटिक ग्रीन व्यापक अवलंबनाला गती देण्यासाठी उत्तमरित्या सुसज्ज आहे. कंपनीची लास्ट-माइल गतीशीलतेसाठी उद्देशरित्या निर्माण केलेली ई-लुना, तसेच कंपनीचा प्रबळ तीन-चाकी कार्गो सेगमेंट पोर्टफोलिओ या विस्तारीकरणाला प्रबळ करत आहे, ज्यामुळे पुरवठा साखळी व्यवस्थापन, ई-कॉमर्स आणि निर्यातींमधील कंपनीची उपस्थिती अधिक दृढ होत आहे.
'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत प्रबळ देशांपर्यंत पाया निर्माण करत कायनेटिक ग्रीन आता आपल्या जागतिक महत्त्वाकाक्षांना पुढे घेऊन जात आहे. कंपनी दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका अशा प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये धोरणात्मकरित्या विस्तार करत आहे. दुचाकी व तीनचाकी क्षेत्रांमधील उल्लेखनीय कौशल्य, तसेच व्यापक जागतिक अनुभवासह श्री. सुधांशू अग्रवाल या विस्तारीकरणाला गती देण्यासाठी उत्तमरित्या सज्ज आहेत, ज्यामुळे कायनेटिक ग्रीन जगभरातील शाश्वत गतीशीलतेमध्ये अग्रस्थानी पोहोचेल.
टीममध्ये त्यांचे स्वागत करत कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, ''आम्हाला आमच्या परिवर्तनाच्या या टप्प्यामध्ये श्री. सुधांशू अग्रवाल कायनेटिक ग्रीनमध्ये सामील होण्याचा आनंद होत आहे. आम्ही शाश्वत गतीशीलतेमधील आमच्या नेतृत्वाला गती देत असताना जागतिक व्यवसाय विस्तारीकरण व धोरणात्मक विकासामध्ये त्यांना असलेला व्यापक अनुभव बहुमूल्य ठरेल. त्यांच्या कौशल्यासह आम्ही आमची उद्योग-ते-उद्योग व निर्यात उपस्थिती वाढवण्यास, हरित गतीशीलतेमधील नाविन्यतेमध्ये अगस्थानी असण्यास आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अनपेक्षित यश संपादित करण्यास उत्तमरित्या सुसज्ज आहोत. त्यांचे नेतृत्व हरित परिवहनाच्या भविष्याला आकार देण्यामध्ये आणि शुद्ध, हरित भविष्याप्रती आमची कटिबद्धता दृढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.''