नेस्ले इंडियाने आणला सेरेग्रो (CEREGROW)चा नवा प्रक्रियायुक्त साखरेपासून मुक्त पर्याय
नेस्ले इंडियाने प्रक्रियायुक्त साखर अर्थात रिफाइन्ड शुगर नसलेले नवीन सेरेग्रो बाजारात लाँच झाल्याची घोषणा केली आहे व अर्थपूर्ण हस्तक्षेपांच्या माध्यमातून ग्राहकांना पोषक पर्याय मिळवून देण्याची आपली बांधिलकी पुन:प्रस्थापित केली आहे. २-६ वर्षांच्या मुलांसाठी तयार करण्यात आलेले सेरेग्रो मल्टीग्रेन सेरेल गहू, तांदूळ, ओट्स, दूध आणि फळांच्या गुणांनी समृद्ध आहे.
याशिवाय सेरेग्रो हे मुलांतील हाडांच्या (कॅल्शियम व व्हिटॅमन डी) व स्नायूंच्या (प्रथिने) सर्वसामान्य वाढीला आधार देणाऱ्या पोषक घटकांसह १९ प्रमुख पोषक घटकांचा स्त्रोत आहे. सेरेग्रोचे प्रत्येक वाडगे प्रथिने, कॅल्शियम, लोह, झिंक, व्हिटॅमीन ए आणि सी यांसारख्या अत्यावश्यक पोषक घटकांचे ३० टक्क्यांहून अधिक आरडीए पुरविते. नव्या फॉर्म्युलेशनमध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (ओमेगा-३)चाही समावेश आहे, जो मेंदूच्या सर्वसामान्य वाढीला आधार देण्याच्या कामी मदत करतो.
नेस्ले न्यूट्रिशन, इंडियाचे हेड श्री. विनीत सिंग म्हणाले, “नेस्ले इंडियामध्ये आम्ही नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व विश्वासार्ह अशी दर्जेदार उत्पादने तयार करण्यासाठी सातत्याने संशोधन व विकासाची ताकद वापरण्याशी कटिबद्ध आहोत. नव्या सेरेग्रोचे बाजारातील पदार्पण म्हणजे ही कटिबद्धता पाळण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे आणि बाळांसाठी व लहान मुलांसाठीच्या आमच्या सर्व उत्पादनांमधून सुक्रोज कमी करण्याच्या व काढून टाकण्याच्या आमच्या वाटचालीचा एक भाग आहे.”
नेस्ले इंडिया सातत्याने सर्वोत्तम पोषण पुरवित आहे व सेरेग्रोचा प्रत्येक पॅक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधी अनेक क्वॉलिटी चेक्समधून जाईल याची काळजी घेत आहे, जेणेकरून हे उत्पादन सेवनासाठी सुरक्षित असल्याची हमी मिळावी.