Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीमंताच्या मागण्या वाढल्यामुळे मालमत्तेच्या किंमतीत वृद्धी: हाऊसिंग डॉटकॉम

 श्रीमंताच्या मागण्या वाढल्यामुळे मालमत्तेच्या किंमतीत वृद्धी: हाऊसिंग डॉटकॉम

मुंबई, २८ मार्च २०२५: ऑल इंडिया हाऊसिंग प्राइस इंडेक्स २०२४ अनुसार, श्रीमंत भारतीयांच्या संख्येत होत असलेल्या लक्षणीय वाढीमुळे भारतातील खूप मोठ्या शहरांमध्ये मालमत्तेच्या सरासरी किंमती तीव्रतेने वाढत आहेत. या इंडेक्समध्ये हे नमूद केले आहे की, हा असा काळ आहे, जेव्हा भारतातील हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स आणि अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सची संख्या १२% इतक्या लक्षणीय चक्रवाढ वार्षिक वृद्धी दराने (वाढत असल्यामुळे प्रीमियम मालमत्तांच्या मागणीने (यात मोठ्या आकाराच्या घरांचाही समावेश आहे) परवडणाऱ्या श्रेणीतील घरांच्या विक्रीला मागे टाकले आहे.


हाऊसिंग प्राइस इंडेक्स हा ऑनलाइन रियल इस्टेट अॅडव्हाइसरी प्लॅटफॉर्म हाऊसिंग डॉटकॉम आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस यांचा एक संयुक्त उपक्रम आहे. हाऊसिंग प्राइस इंडेक्स हा इंडेक्स काळापरत्वे नवीन निवासी मालमत्तांच्या विक्रीच्या किंमतीत होणाऱ्या बदलांचा माग घेतो. मार्केट ट्रेंड आणि किंमतीतील चढ-उतार याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देणारा हाऊसिंग प्राइस इंडेक्स हा घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी, गुंतवणूकदारांसाठी, विकासकांसाठी आणि धोरण बनवणाऱ्यांसाठी एक मुख्य मापदंड आहे. भारतातील गतिशील रियल इस्टेट क्षेत्रात माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी मदत करणारे ते आवश्यक असे साधन आहे.




ऑल-इंडिया हाऊसिंग प्राइस इंडेक्स ४ पॉइंटने वाढला; बहुतांशी शहरात किंमतींमधील वाढ सकारात्मक आहे:

डिसेंबर २०२४साठी, हाऊसिंग प्राइस इंडेक्सचे देशभरातील रीडिंग १२९ पॉइंट आहे, जे जानेवारीपेक्षा चार पॉइंटने वाढले आहे. इंडेक्स डेटाची मुख्य निरीक्षणे अधोरेखित करत, कंपनीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ही वार्षिक वृद्धी दमदार मागणी आणि उपभोक्त्याची सकारात्मक भावना यांनी समर्थित आहे. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत वृद्धीची गती मंदावली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये हाऊसिंग प्राइस इंडेक्स १३२ पॉइंट होता, जे भारतीय रियल इस्टेटसाठी एक लक्षणीय वर्ष होते.


काही अपवाद वगळता (मुंबई मेट्रोपोलिटन रीजन आणि अहमदाबाद), विश्लेषणात समाविष्ट असलेल्या बहुतांशी शहरांत किंमतींमध्ये सकारात्मक बदल दिसून आला आहे, ज्यामुळे काही शहरांत तर किंमती किफायतशीरतेची पातळी ओलांडून गेल्या आहेत. हे अशा वेळी घडले आहे, ज्यावेळी सरकार निवासी किफायतशीरता सुधारण्यासाठी नवीन धोरणे तयार करत आहे.

गेल्या एखाद-दोन वर्षात मागणीत जबरदस्त वाढ झालेली असताना डिसेंबरमध्ये इंडेक्सवर एनसीआरचे रीडिंग सर्वाधिक १९५ इतके आहे. जमीन आणि बांधकामाच्या किंमती आकाशाला भिडल्या असून देखील इतर बाजारांतील मोठमोठ्या कंपन्या या प्रदेशातील वाढत्या श्रीमंत वर्गाच्या मागण्यांचा लाभ घेण्यासाठी आपले पहिलेवहिले प्रकल्प येथे लॉन्च करताना दिसत आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारकारांकडून इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक आणि वाढत्या इक्विटी प्रवाहामुळे येथे किंमतींमधील तेजी अशीच चालू राहण्याची संभावना आहे. यातही द्वारका एक्सप्रेस वे, सोहना आणि नोयडा एक्सटेन्शन यांसारखे मुख्य मायक्रो बाजार गुंतवणुकीची प्रमुख आकर्षण केंद्रे आहेत, असे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. सतत वाढत्या व्यावसायिक शक्यतांनी बंगळूर आणि हैदराबाद या देशातील दोन अग्रणी आयटी केंद्रांना या इंडेक्समध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी पोहोचवले आहे.


हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे ग्रुप सीईओ श्री. ध्रुव अग्रवाल म्हणाले, “किंमतींमधील वाढ जगातील पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या विकास आणि समृद्धीची द्योतक आहे. अर्थात, यातून भारतातील मध्यमवर्गावरील वाढता बोजा देखील सूचित होतो. रियल इस्टेटमध्ये संतुलित वाढ होत राहावी यासाठी घरांची किफायतशीरता अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये जाहीर केलेली अधिक चांगली कर सूट आणि व्याज दरातील शिथिलता यांच्या रूपात सकारात्मक दृढता आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी भू-राजकीय (जिओ-पॉलिटिकल) मुद्दे इनपुट खर्चावर आणखी दबाव आणून रंगाचा भंग करू शकतात.”


भारतातील श्रीमंतांच्या संख्येत होत असलेल्या वाढीबरोबर प्रीमियम जागांची मागणी वाढत चालली आहे:

किंमतींमधील वाढीसोबतच मोठ्या घरांची मागणी देखील वाढत चालल्याचे दिसत आहे. यामधून भारतातील घर खरेदी करणाऱ्यांच्या प्राथमिकता बदलत चालल्याचे दिसून येत आहे. डिसेंबरसाठी अखिल भारतीय विन्यास-वार (कॉन्फिगरेशन-वाइज) हाऊसिंग प्राइस इंडेक्स ३बीएचके घरांसाठी १४१ आहे, जे जानेवारीपासून ११ पॉइंट वाढले आहे; तर १बीचकेचे याच कालावधीतील रीडिंग १२३ हून कमी होऊन ११७ झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.