मिल्की मिस्टची मिल्कलेनबरोबर हातमिळवणी
मुंबई, ६ एप्रिल २०२५: इनोटेराचा दुग्ध व पशूखाद्य उद्योग मिल्कलेनने भारताचा अभिनव डेअरी ब्रॅण्ड मिल्की मिस्टबरोबर धोरणात्मक हातमिळवणी केली आहे, जेणेकरून मिल्की मिस्टच्या विस्तारणाऱ्या उत्पादनश्रेणीसाठी उच्च दर्जाच्या व १०० टक्के ट्रेसेबल येण्याजोग्या दुधाच्या सातत्यपूर्ण पुरवठ्याची हमी मिळावी.
अव्वल दर्जाच्या दुधाचा पुरवठा करण्यासाठी मिल्कलेन आपल्याकडील शेतकऱ्यांच्या भक्कम नेटवर्कचा व कठोर निकषांद्वारे केल्या जाणाऱ्या दर्जा नियंत्रणाचा वापर करेल, त्याचवेळी मिल्की मिस्ट उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी आपले प्रगत प्रोसेसिंग तंत्रज्ञान व बाजारपेठेतील पोहोच उपयोगात आणेल. या सहयोगातून कच्च्या दुधाचा दर्जा, पुरवठा साखळीतील पारदर्शकता आणि कार्यान्वयनातील कार्यतत्परता यांसह या उद्योगक्षेत्रासमोर असलेल्या महत्त्वाच्या आव्हानांना हाताळले जाईल व अंतिमत: याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही होईल.
रु. ४००० कोटींहून अधिकच्या या कराराअंतर्गत मिल्कलेन तीन वर्षांच्या कालावधीत मिल्की मिस्टला प्रति दिन १०० किलोलीटर्स अव्वल दर्जाच्या दुधाचा पुरवठा करेल. १०,००० हून अधिक शेतकऱ्यांना या भागीदारीचा थेट लाभ मिळणार असून त्यातून वाजवी दराची तसेच उच्च पोषण मूल्य असलेल्या पशूखाद्य उपाययोजनांच्या उपलब्धतेची हमीही मिळणार आहे. मिल्कलेनद्वारे दर्जा नियंत्रणाच्या पद्धतींची कठोर अंमलबजावणी केली जाईल. यात कंपनीच्या १००% बल्क मिल्क कूलर (बीएसमसी) मॉडेल कार्यपद्धती, इनोव्हेटिव्ह स्टेनलेस स्टील (एसएस) कॅनमधून दूध वितरणाची पद्धत आणि दूध गोळा करण्यासाठीच्या कलेक्शन सेंटर्समध्ये केल्या जाणाऱ्या अँटिबायोटिक्स व भेसळीचे निदान करणाऱ्या कठोर चाचण्यांचा समावेश असेल, जेणेकरून केवळ अत्यंत शुद्ध स्वरूपातील दूध मिल्की मिस्टच्या प्रक्रिया केंद्रामध्ये पोहोचावे.
मिल्कलेनचे मॅनेजिंग डायरेक्टर हरीश शर्मा म्हणाले, “मिल्की मिस्टबरोबरच्या आमच्या भागीदारीमधून दुग्धउत्पादन क्षेत्रामध्ये पारदर्शकता, शाश्वतता आणि शेतकऱ्यांचे पाठबळ प्राप्त करण्याचे सामायिक ध्येय प्रतिबिंबित होते. मिल्की मिस्टच्या विस्तारत्या व्हॅल्यू अॅडेड दुग्ध उत्पादनांच्या श्रेणीसाठी दूध प्राप्त करण्याच्या एकूण एका पायरीचा १०० टक्के माग काढता येण्याजोग्या व उच्च दर्जाच्या उत्कृष्ट दुधाचा पुरवठा करत मिल्की मिस्टला पाठबळ देण्याचे आमचे लक्ष्य आहे."
मिल्की मिस्टचे सीईओ डॉ. के. रत्नम म्हणाले, “आम्ही ग्राहकांना अभिनव, उच्च दर्जाची, व्हॅल्यू अॅडेड दुग्ध उत्पादने पुरविण्याप्रती कटिबद्ध आहोत. मिल्कलेनबरोबर केलेल्या भागीदारीमुळे आम्हाला कठोर चाचण्यांतून पार झालेले उत्कृष्ट दर्जाचे दूध सातत्याने प्राप्त होण्याची हमी मिळेल, ज्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी सुरक्षा व दर्जाच्या उच्चतम निकषांना पूर्ण करणे शक्य होईल. इतकेच नव्हे तर उचित दर व शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले पशूखाद्य यांच्यासह मिल्कलेनने जपलेल्या शेतकरी-केंद्री दृष्टिकोनामुळे दुग्ध उत्पादनाची परिसंस्था बळकट होईल – ज्याचा फायदा उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही होईल."