Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऑडी इंडियाच्या विक्रीत पहिल्‍या तिमाहीत वाढ

 ऑडी इंडियाच्या विक्रीत पहिल्‍या तिमाहीत वाढ


~ २०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीत १२२३ युनिट्सची विक्री करण्‍यात आली ~


मुंबई, १ एप्रिल २०२५: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज २०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीसाठी त्‍यांच्‍या विक्री आकडेवारीची घोषणा केली, जेथे १,२२३ युनिट्सच्‍या विक्रीसह सकारात्‍मक कामगिरी दिसून आली. या विक्रीमध्‍ये २०२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीच्‍या तुलनेत १७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, ज्‍यामधून लक्‍झरी कार बाजारपेठेतील ब्रँडची वाढती मागणी दिसून येते.


२०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील प्रभावी निकालांमधून आपला वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओ आणि नवीन पुरवठा साखळी स्थिरतेमधून फायदा घेण्‍याचे ऑडी इंडियाचे यशस्‍वी प्रयत्‍न निदर्शनास येतात. या विकासासाठी प्रमुख योगदानकर्ता म्‍हणजे ऑडी क्‍यू७ आणि ऑडी क्‍यू८ यांसारख्‍या मॉडेल्‍सची सातत्‍यपूर्ण लोकप्रियता. ही कामगिरी गेल्‍या वर्षापासून गतीवर आधारित आहे, जेथे ऑडी इंडियाने भारतातील रस्‍त्‍यांवर १००,००० कार्स धावण्‍याचा टप्‍पा साजरा केला.




ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ''आम्‍हाला पहिल्‍या तिमाहीच्‍या उल्‍लेखनीय निकालांसह २०२५ ची सकारात्‍मकतेसह सुरूवात करण्‍याचा आनंद होत आहे. गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीच्‍या तुलनेत या वाढीमधून ब्रँड ऑडीमध्‍ये असलेला ग्राहकांचा आत्‍मविश्‍वास आणि आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओची ताकद दिसून येते. २०२४ मध्‍ये पुरवठ्यासंदर्भातील आव्‍हानांची यशस्‍वीपणे पूर्तता केली असल्‍याने आम्‍ही भारतातील लक्‍झरी गतीशीलतेकरिता वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहोत. आम्‍ही अपवादात्‍मक उत्‍पादने व अनुभव वितरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, तसेच आम्‍ही आगामी वर्षामध्‍ये सकारात्‍मक कामगिरीसाठी उत्‍सुक आहोत.''


ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस या ब्रँडच्‍या पूर्व-मालकीच्‍या कार व्‍यवसायाने आपली विकास गती कायम राखली, जेथे २०२४ मधील याच कालावधीच्‍या तुलनेत २०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीत २३ टक्‍के वाढ केली. देशभरातील प्रमुख ठिकाणी २६ केंद्रांसह कार्यरत राहत हा विभाग प्रमाणित पूर्व-मालकीच्‍या लक्‍झरी वेईकल्‍ससाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याच्‍या ऑडी इंडियाच्‍या धोरणाचा आधारस्‍तंभ आहे.


ऑडी इंडियाने नुकतेच 'ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स' लाँच केली, जी ऑडीच्‍या लाइनअपमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्‍ही आहे आणि या एसयूव्‍हीमध्‍ये लक्‍झरीच्‍या लॅपमधील दैनंदिन उपयुक्‍ततेसह अपवादात्‍मक कार्यक्षमता आहे. या एसयूव्‍हीला ग्राहकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि २०२५ च्‍या तिसऱ्या तिमाहीपर्यंत संपूर्ण विक्री करण्‍यात आली आहे.


ऑडी इंडिया उत्‍पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्‍यू३, ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, ऑडी क्‍यू५, ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन स्‍पोर्टबॅक, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.