आयटेलने एआय-पॉवर्ड ‘ए९५ ५जी’ स्मार्टफोन लाँच केला
मुंबई, १७ एप्रिल २०२५: आयटेलने त्यांचा नवीन पॉवरहाऊस ‘ए९५ ५जी' लाँच केला आहे. हा स्मार्टफोन टिकाऊपणा, विश्वसनीय कार्यक्षमता आणि अत्यंत गतीशील कनेक्टीव्हीटीची मागणी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. दैनंदिन जीवनातील टास्क्सदरम्यान टिकून राहण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ए९५ ५जी मध्ये धूळ व पाण्याच्या थेंबांपासून प्रतिबंधासाठी आयपी५४ रेटिंग आहे. तसेच ए९५ ५जी मध्ये आयटेलचे सुपर इंटेलिजण्ट एआय असिस्टण्ट आयवाना आहे, जे दैनंदिन टास्क्स गतीशीलपणे व सुलभपणे करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ए९५ ५जी दोन डायनॅमिक व्हेरिएण्ट्समध्ये येतो - ४ जीबी व ६ जीबी रॅम, ज्यांची किंमत अनुक्रमे फक्त ९,५९९ रूपये आणि ९,९९९ रूपये आहे.
याला पूरक बिल्ट-इन आस्क एआय टूल आहे, जे ग्रॅमर चेक, टेक्स्ट जनरेशन आणि कन्टेन्ट डिस्कव्हरी यांसारखी उपुयक्त वैशिष्ट्ये देते, जेथे ही वैशिष्ट्ये किफायतशीर स्मार्टफोन सेगमेंटमध्ये कधीच ऐकण्यात आलेली नव्हती, ज्यामुळे हा त्याच्या सेगमेंटमधील सर्वात इंटेलिजण्ट स्मार्टफोन आहे. कन्टेन्ट तयार करायचा असो, माहितीचा सारांश पाहिजे असो किंवा विविध संदर्भांसाठी थोडक्यात मेसेज तयार करायचा असो आस्क एआय तुम्हाला सर्व सुविधा देते. ए९५ ५जी मध्ये मीडियाटेक डी६३०० प्रोसेसरची शक्ती आहे आणि हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर संचालित आहे. हा स्मार्टफोन विविध ५जी बँड्ससह रिअल ५जी कनेक्टीव्हीटी देतो, जे विविध ऑपरेटर्ससाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे गतीशील डाऊनलोड्स, सुलभ स्ट्रीमिंग आणि व्यस्त क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कनेक्टीव्हीटीची खात्री मिळते. हा स्मार्टफोन ५-वर्ष फ्लूएन्सी अनुभवासह कोणत्याही स्लोडाऊन्सशिवाय दीर्घकाळपर्यंत कार्यक्षमतेची खात्री देतो, जे १० हजारांहून कमीच्या सेगमेंटमध्ये क्वचितच पाहायला मिळते. या स्मार्टफोनमधील प्रबळ पांडा ग्लास डिस्प्ले ओरखडे आणि नकळतपणे जमिनीवर खाली पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतो. तसेच १०० दिवसांमध्ये मोफत स्क्रिन रिप्लेसमेंट देखील मिळते, ज्यामधून अद्वितीय विश्वसनीयतेची खात्री मिळते.
आयटेलच्या नवीन इनोव्हेटिव्ह लाँचबाबत मत व्यक्त करत आयटेल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरिजीत तालापात्रा म्हणाले, “भारतातील स्मार्टफोन वापरकर्ते बदलत आहेत. ते आता अधिक माहितीपूर्ण असण्यासोबत अधिक मागणी करत आहेत आणि दीर्घकालीन मूल्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. आम्हाला डिवाईसेसप्रती स्पष्ट बदल दिसून येत आहे, जे टिकाऊपणा, कार्यक्षमता आणि फ्यूचर-रेडी वैशिष्ट्ये देतात. ए९५ ५जी स्मार्टफोन या परिवर्तनाप्रती आमचा प्रतिसाद आहे. यामधून व्यावहारिक इनोव्हेशनवरील आमचा फोकस आणि प्रगत तंत्रज्ञान देशभरात उपलब्ध करून देण्यासाठी आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो. आयटेलचे एआय असिस्टण्ट आयवाना आणि आस्क एआय जनरेटिव्ह वैशिष्ट्यांच्या सादरीकरणासह आम्ही भारतासाठी एआयमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी उत्तमरित्या सज्ज आहोत.''
दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन ६जी रॅम (जवळपास १२ जीबीपर्यंत विस्तारित करता येईल) आणि ४जीबी रॅम व्हेरिएण्ट्स (जवळपास ८ जीबीपर्यंत विस्तारित करता येईल) यांसह येतो. विशाल ५००० एमएएच बॅटरी असलेला ए९५ ५जी विश्वसनीय, दीर्घकालीन कार्यक्षमता देतो. ए९५ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल कॅमेरासह एआय वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन किफायतशीर किमतीत प्रीमियम नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये पाहिजे असलेल्या ग्राहकांसाठी परिपूर्ण आहे. अल्ट्रा स्लिम ७.८ मिमी बॉडीसह हा स्मार्टफोन हातामध्ये सहजपणे मावतो. ए९५ ५जी मध्ये ६.६७-इंच पंच-होल डिस्प्ले आहे, जे स्मूद व्युइंग अनुभव देते. १२० हर्टझ स्क्रिन रिफ्रेश रेट आणि २४० हर्टझ टच रिस्पॉन्स स्क्रॉलिंग व गेमिंग अधिक सुलभ व प्रतिसादात्मक करतात. हा डिवाईस दोन व्हेरिएण्ट्समध्ये लाँच करण्यात येणार आहे - ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम, जेथे दोन्ही व्हेरिएण्ट्समध्ये १२८ जीबी स्टोरेज क्षमता आहे. या स्मार्टफोनच्या लाँचसह आयटेल विश्वसनीयता, टिकाऊपणा आणि नाविन्यतेचे स्वत:चे उच्च मानक अधिक उत्तम करत आहे.
फोटोग्राफीप्रेमींसाठी ए९५ ५जी परिपूर्ण सोबती आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रगत कॅमेरा वैशिष्ट्ये आहेत, जी सहजपणे आकर्षक फोटोज व व्हिडिओज कॅप्चर करण्यास मदत करतात. ए९५ ५जी मध्ये शक्तिशाली ५० मेगापिक्सल मेन कॅमेरा आहे, जो आकर्षक क्लेरिटीसह सुस्पष्टपणे फोटोज कॅप्चर करतो, तसेच सुस्पष्ट व आकर्षक सेल्फीज कॅप्चर करण्यासाठी ८ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये हाय-क्वॉलिटी २के व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि क्रिएटिव्ह मोड्सची श्रेणी आहे, जसे व्हीलॉग मोड, स्काय इफेक्ट्स आणि ड्युअल व्हिडिओ कॅप्चर, ज्यामुळे वापरकर्त्यांना अभूतपूर्वरित्या अभिव्यक्त करण्यासाठी टूल्स मिळतात. या नाविन्यपूर्ण स्मार्टफोनच्या बाजूला सुरक्षित अॅक्सेससाठी फिंगरप्रिंट सेन्सर, स्थिर इंटरनेटसाठी ड्युअल बँड वाय-फाय आणि प्रत्यक्ष फोनमधून टीव्ही किंवा एअर कंडिशनर्स यासारख्या होम अप्लायन्सेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्फ्रारेड ब्लास्टर आहे. स्लिम व शक्तिशाली रचना, रिअल ५जी क्षमता, उपयुक्त एआय वैशिष्ट्ये आणि विश्वसनीय दीर्घकालीन कार्यक्षमतेसह आयटेल ए९५ ५जी आजच्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी महत्त्वाच्या