*मुंबई पोलिसांकरिता सायबर सिक्युरिटी आणि सायबर गुन्हा अन्वेषण प्रशिक्षणाचे आयोजन*
मुंबई, २० एप्रिल २०२५: मुंबई पोलिसांनी सायबर गुन्ह्याचा आपला प्रतिसाद मजबूत करण्यासाठी आपल्या २५३ अधिकाऱ्यांसाठी एक तीन-दिवसीय सायबर अन्वेषण आणि फॉरेन्सिक प्रशिक्षण आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) आणि युनाइटेड वे मुंबईचे समर्थन आहे.
ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, आर्थिक सायबर धमक्या आणि सोशल मीडियाचा गैरवापर यांसारखे डिजिटल गुन्हे हाताळण्यासाठी सायबर सेल्स, क्राइम ब्रांच, डिटेक्शन युनिट्स आणि अॅंटी-नार्कोटिक्स सेल्समधील अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या प्रसंगी बोलताना क्राइम ब्रांच, मुंबईचे पोलिस उपायुक्त श्री. दत्ता नलावडे म्हणाले, “सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि त्यातील अत्याधुनिकता देखील वाढते आहे, त्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांनी क्षमतेत त्यांच्या पुढे असणे अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल धमक्यांचा तपास आणि त्यावरील प्रतिक्रिया अधिक कार्यक्षमतेने देण्यासाठी आपल्या दलाला तयार करण्यात या प्रशिक्षणाची मोठी भूमिका आहे. त्याच बरोबर लोकांमधील जागरूकता देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि लोकांना सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल पद्धतींबाबत शिक्षित करण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, ते कौतुकास्पद आहेत.”
नवी मुंबईचे पोलिस (मुख्यालय) उपायुक्त श्री. संजयकुमार पाटील म्हणाले, “आमच्या अधिकाऱ्यांसाठी असे नेमक्या विषयावरील प्रशिक्षण योजण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी युनाइटेड वे मुंबईने फेडएक्सच्या समर्थनाने हा जो उपक्रम हाती घेतला आहे, त्याचे आम्ही कौतुक करतो. या सहयोगामुळे सायबर धमक्यांना आम्ही देत असलेल्या एकत्रित प्रतिक्रियेस बळकटी मिळेल आणि आपल्या सगळ्यांसाठी एक सुरक्षित डिजिटल वातावरण उभे राहील.”
हा प्रशिक्षण कार्यक्रम सायबर सिक्युरिटी जागरूकता पसरवण्यासाठी आणि संस्थांच्या क्षमता वाढवण्यासाठी, फेडएक्सच्या समर्थनाने युनाइटेड वे मुंबईने चालवलेल्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग आहे. आत्तापर्यंत युनाइटेड वे मुंबई मुंबई, नवी मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळूर येथील १०,००० पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचली आहे. फक्त मुंबईतच ५,१९७ महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना सायबर स्वच्छता आणि डिजिटल सुरक्षा पद्धतींविषयी माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमाने नवी मुंबई पोलिसांतील देखील ५०० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना सायबर गुन्हा अन्वेषणात प्रशिक्षित केले आहे.
सायबर गुन्ह्याविरुद्ध वाढीव डिजिटल सुरक्षा आणि लवचिकता यांच्या माध्यमातून समुदायांना सक्षम बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून फेडएक्सने या कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. मार्केटिंग, एअर नेटवर्क आणि कस्टमर एक्सपिरियंस, मिड्ल ईस्ट, इंडियन सबकॉन्टिनेन्ट अँड आफ्रिका, फेडएक्सचे उपाध्यक्ष नितीन टाटीवाला म्हणाले, “डिजिटल दृष्ट्या सुरक्षित भारताच्या उभारणीसाठी सरकारी प्राधिकारी आणि नागरी समाज संस्थांसोबत काम करताना फेडएक्सला अभिमान वाटत आहे. आपल्या समुदायाचे रक्षण करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी निरंतर झटणाऱ्या मुंबई पोलिसांचे आम्ही ऋणी आहोत आणि या सत्रांचे आयोजन करण्यासाठी आमच्याशी सहयोग केल्याबद्दल आम्ही युनाइटेड वे मुंबईला दाद देतो.”