Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ग्राउंड झीरोच्या प्रमोशन साठी सईची अनोखी फॅशन !

 ग्राउंड झीरोच्या प्रमोशन साठी सईची अनोखी फॅशन !

सलवार सूट आणि सईच्या फॅशन स्टेटमेंटच्या चर्चा !


सई ताम्हणकर सध्या आगामी " ग्राउंड झीरो " च्या प्रमोशन मध्ये एवढी व्यस्त आहे तरीही तिच्या या मल्टीटास्किंग गोष्टीचं कौतुक होताना दिसतंय. बॅक टू बॅक शूट आणि त्यातून प्रवास, चित्रपटाच प्रमोशन करून सई तिचे फॅशन गेम तितकेच खास करताना दिसतेय. 



चित्रपटसृष्टीत 38 वर्षांनी पहिल्यांदा श्रीनगर मध्ये एखाद्या चित्रपटाच स्क्रिनिंग झालं आणि हा ऐतहासिक सोहळा सईने ग्राउंड झीरो निमित्तानं अनुभवला. श्रीनगर नंतर दिल्ली अश्या दोन्ही ठिकाणी या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग पार पडलं असून ग्राउंड झीरो च्या या ग्रँड प्रीमियर साठी सईने साधा पण तितकाच लक्षवेधी पेहराव केला होता. 


सईने श्रीनगर येथील ग्रँड प्रीमियर साठी लाल रंगाचा आकर्षक आणि तितकाच सुंदर सलवार सूट घातला होता तिच्या लूकने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. ग्लॅमर आणि तिच्या लक्षवेधी लूक ने ती पुन्हा स्पॉट लाईट मध्ये चमकून गेली. 



एवढं काय तर सई ने दिल्ली मधल्या स्क्रिनिंग आणि प्रेस इंटरव्ह्यू साठी देखील दिसायला खास आणि सुंदर लूक केला होता. ब्लू फ्लोरल प्रिंटेड सलवार मध्ये सईच सौंदय अजून खुलून दिसत होत आणि दिल्ली मधल्या प्रेस इंटरव्ह्यू साठी सई ने गुलाबी रंगाचा ग्लोइंग सलवार कमीज परिधान केला होता. 

तिच्या या सलवार सुट ने पुन्हा एकदा सईच्या स्टाईल स्टेटमेंट च्या चर्चा होताना दिसतात. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सई कायम ओळखली जाते पण तिच्या फॅशन चॉईस देखील सगळ्यांना भुरळ पाडून जातात.


गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड मधल्या कामाची रेलचेल बघायला मिळते असं म्हणायला हरकत नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करून सई बॅक टू बॅक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मध्ये सई तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसतेय.

येणाऱ्या काळात सई अजून कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.