Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया बनले ‘अव्वल निर्यातक'

 स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया बनले ‘अव्वल निर्यातक'


~ सुमारे ७० देशांमध्ये ६७५,००० पेक्षा जास्त मेड-इन-इंडिया कार निर्यात केल्या ~



मुंबई, ३ एप्रिल २०२५: स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल)ला मुंबई बंदर प्राधिकरणाने ‘अव्वल निर्यातक २०२३-२०२४’ म्हणून मान्यता दिली आहे. या समूहाने आजवर ६७५,००० पेक्षा जास्त गाड्या निर्यात केल्या आहेत आणि इंजिनियरिंग आणि उत्पादन उत्कृष्टतेबाबतची आपली वचनबद्धता मजबूत केली आहे. २०२३ मध्ये या समूहाने विक्रमी ३८% वार्षिक वृद्धी नोंदवली होती आणि त्यात निर्यातीचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या ३०% इतके होते. पाठोपाठ २०२४ मध्ये २०% वार्षिक वृद्धी झाली असून स्थानिक पातळीवर उत्पादित वाहनांमध्ये निर्यातीचा वाटा ४०% होता.  भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ व्हिजनशी सुसंगत राहून एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने भारताला एक महत्त्वाचा ऑटोमोटिव्ह निर्यातक केंद्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


२०२३-२४ मध्ये एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने एशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील २६ पेक्षा जास्त देशांमध्ये स्थानिक स्तरावर निर्मित ४३,००० पेक्षा जास्त कार्स निर्यात केल्या. फॉक्सवॅगन व्हेंटो आणि पोलो या प्रसिद्ध मॉडेल्सपासून ते फॉक्सवॅगन व्हर्टस, फॉक्सवॅगन टाईगुन आणि स्कोडा कुशॅक या नव्या काळाच्या मॉडेल्सपर्यंत एसएव्हीडब्ल्यूआयपीएलच्या मेड इन इंडिया कार्स आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवत आहेत, ज्यामुळे त्यांची जागतिक उपस्थिती मजबूत होत आहे आणि या समूहाच्या जागतिक धोरणात भारताचे महत्त्व देखील वाढत आहे.


स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनिजिंग डायरेक्टर आणि सीईओ पियुष अरोरा या सिद्धीविषयी टिप्पणी करताना म्हणाले, “हा पुरस्कार प्राप्त करताना आम्ही गौरव अनुभवत आहोत. हा पुरस्कार गुणवत्ता आणि इनोव्हेशनप्रती आमच्या अढळ वचनबद्धतेची आणि भारतात डिझाईन करून उत्पादन केलेल्या कार्सच्या जगातील स्तरावरील वाढत्या उपस्थितीची साक्ष देतो. गेली अनेक वर्षे आम्ही एक मुख्य निर्यात केंद्र म्हणून आमची क्षमता दाखवली आहे. आणि जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगात भारताची भूमिका सशक्त करण्याबाबत आम्ही आजही समर्पित आहोत. बंदर प्राधिकरण, आमच्या निष्ठावान टीम्स, भागीदार आणि भाग धारक यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. कारण या सगळ्यांच्या सहयोगानेच हे यश आम्ही प्राप्त करू शकलो आहोत. वर्तमान २०२५ या वर्षात आम्ही निर्यातीची कामगिरी अशीच चालू ठेवून निर्यातीच्या आणखी संधींचा देखील शोध घेत राहू.”



आपल्या विस्तारित निर्यात धोरणाचा एक भाग म्हणून ही कंपनी आपल्या पुण्यातील पार्ट्स एक्स्पीडिशन सेंटरमधून व्हिएतनामला गाडीचे भाग देखील निर्यात करत आहे, ज्यामुळे त्या प्रांतात स्थानिक वाहन असेंबली करण्यास मदत होऊ शकते. ही धोरणात्मक चाल भारताच्या उत्पादन क्षमतेचा आणि भौगोलिक अनुरूपतेचा लाभ घेऊन जागतिक स्तरावर भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या विकासात योगदान देते.


देशांतर्गत ईकोसिस्टम विकसित करण्यावर, स्थानिक प्रतिभेस वाव देण्यावर आणि देशात चालणारी व जगभरात वाखाणली जाणारी जागतिक दर्जाची, उच्च गुणवत्तेची वाहने विकसित करण्यावर स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे लक्ष नेहमीच केंद्रित असते. सदर मैलाचा दगड पार करताना हा समूह ‘मेड इन इंडिया, फॉर इंडिया अँड द वर्ल्ड’ प्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहे आणि भारतीय उत्पादनातील उत्कृष्टता जागतिक मंचावर घेऊन जाण्याचे काम निष्ठेने करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.