*आशीष सराफची भारतातील आरटीएक्स च्या प्रॅट अँड व्हिटनी व्हाईस प्रेसिडेंट आणि कंट्री हेड म्हणून नियुक्ती*
या नवीन भूमिकेत आशीष भारतातील सर्व प्रकारची धोरणात्मक वृद्धी आणि परिवर्तनाच्या प्रयत्नांचे नेतृत्व करणार
नवी दिल्ली, भारत (14 एप्रिल, 2025) – RTX (NYSE: RTX) चा व्यवसाय असलेल्या प्रॅट अँड व्हिटनीने आज भारतातील प्रॅट अँड व्हिटनीचे व्हाईस प्रेसिडेंट आणि कंट्री हेड पदावर आशीष सराफ यांची नियुक्ती केल्याचे घोषित केले.
प्रॅट अँड व्हिटनीनेचे सर्वात वरिष्ठ इन-कंट्री लीडर या नात्याने आशीष भारतातील सर्व प्रकारची धोरणात्मक वृद्धी आणि परिवर्तनाच्या प्रयत्नांचे नेतृत्व करतील. ते प्रॅट अँड व्हिटनीचे इन-कंट्री इंजिनियरिंग, पुरवठा साखळी, ग्राहक सेवा, संचालन आणि डिजिटल परिवर्तन केंद्रांच्या वृद्धीसाठी आणि आखणीसाठी जबाबदार असतील.
आशीष या आधी एरोस्पेस, संरक्षण, बायोमेट्रिक्स, सायबर सिक्युरिटी आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसहित सर्व थेल्स इंडिया व्यवसायांसाठी डायरेक्टर आणि अध्यक्ष म्हणून काम करत होते. तेथून ते प्रॅट अँड व्हिटनीमध्ये सामील झाले आहेत.
प्रॅट अँड व्हिटनीचे चीफ डिजिटल ऑफिसर सतीशकुमार कुमारसिंगम म्हणाले, “प्रॅट अँड व्हिटनीने गेल्या चार वर्षांत आपल्या भारतातील इंजिनियरिंग, डिजिटल परिवर्तन, पुरवठा साखळी आणि आफ्टरमार्केट उपस्थितीच्या विस्तारासाठी $40 मिलियन पेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. आशीष यांचे प्रॉफिट अँड लॉस मॅनेजमेंट, व्यवसाय परिवर्तन आणि धोरणात्मक भागीदारी वगैरे विषयांतील नैपुण्य भारतातील विकासाच्या नवीन टप्प्याला आधार देईल.”
आशीष सराफ यांच्याकडे या उद्योगातील आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील 20 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. एरोस्पेस, संरक्षण, बायोमेट्रिक्स आणि उत्पादन क्षेत्रात त्यांनी व्यापक काम केले आहे. थेल्समधील आपल्या कार्यकालापूर्वी आशीष सराफ यांनी एअरबस आणि टाटा-सिकॉर्स्की संयुक्त उद्यमात विविध नेतृत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी डिलॉइट कन्सल्टिंगमध्ये देखील काम केले आहे. येथे अमेरिका आणि युरोपमधील उत्पादन आणि इंजिनियरिंग क्षेत्रातील रणनीती, संचालन आणि पुरवठा साखळी यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.
प्रॅट अँड व्हिटनी सात दशकांपेक्षा जास्त काळापासून भारतीय एरोस्पेसला सशक्त बनवत आहे. त्यांच्या वाढत्या उपस्थितीत आता 800 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज प्रॅट अँड व्हिटनीची इंजिन्स आणि साहाय्यक पॉवर युनिट्स भारतातील व्यावसायिक, प्रादेशिक आणि लष्करी विमान वाहतुकीतील सुमारे 600 एअरक्राफ्ट्सना आधार देत आहेत. ज्यामध्ये A320neo फॅमिली, ATR 72s आणि भारतीय वायुसेनेच्या C-295s आणि C-17 ग्लोबमास्टर IIIs चा समावेश आहे.