Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फक्त ६४९९ रुपयांत अत्‍याधुनिक वैशिष्ट्यांसह 'पोको सी७१' लॉन्च

 फक्त ६४९९ रुपयांत अत्‍याधुनिक वैशिष्ट्यांसह 'पोको सी७१' लॉन्च

मुंबई, ४ एप्रिल २०२५: को हा भारतातील आघाडीचा परफॉर्मन्‍स-संचालित ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड नवीन लाँच करण्‍यात आलेला स्‍मार्टफोन पोको सी७१ सह पुन्‍हा एकदा बजेट स्‍मार्टफोन सेगमेंटमध्‍ये धुमाकूळ निर्माण करण्‍यास सज्‍ज आहे. पोको सी७१ मध्‍ये उच्‍च-स्‍तरीय डिस्‍प्‍ले, अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये आणि अतुलनीय दरामध्‍ये शक्तिशाली कार्यक्षमता आहे.


फक्‍त ६४९९ रूपये किंमत असलेला पोको सी७१ त्‍याच्‍या सेगमेंटमधील एकमेव स्‍मार्टफोन आहे, ज्‍याच्‍यामध्‍ये विशाल ६.८८ इंच एचडी+ डिस्‍प्‍लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि सेगमेंट लीडिंग टीयूव्‍ही राइनलँड ट्रिपल आय प्रोटेक्‍शन आहे. मनोरंजनाचा मनमुराद आनंद घ्‍यायचा असो किंवा स्‍क्रॉलिंग करायचे असो सुरक्षित, स्‍मूदर आणि अधिक सर्वोत्तम अनुभवाचा आनंद घ्‍या. वेट टच डिस्‍प्‍ले हात ओले असताना किंवा हलक्‍या पावसामध्‍ये देखील अचूक टच रेकग्निशनची खात्री देतो.


स्‍लीक फ्लॅट फ्रेमसह सुधारित, स्‍टायलिश कॅमेरा डेको डिवाईसला प्रीमियम लुक व फिल देतात, ज्‍यामुळे हा स्‍मार्टफोन त्‍याच्‍या सेगमेंटमध्‍ये वरचढ ठरतो. आकर्षक, लक्षवेधक लुकसाठी प्रीमियम गोल्‍डन रिंग कॅमेरा डेको आणि वैशिष्‍ट्यपूर्ण स्प्लिट-ग्रिड डिझाइन आहे. फक्‍त ८.२६ मिमी स्लिम असलेला हा स्‍मार्टफोन आरामदायी ग्रिप देतो, ज्‍यामुळे दिवसभर स्‍मार्टफोन प्रभावीपणे हाताळता येतो. गोल्‍ड, ब्‍ल्‍यू व ब्‍लॅक या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेला पोको सी७१ एकाच डायनॅमिक पॅकेजमध्‍ये आकर्षकता व कार्यक्षमता देतो.   


पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्‍हणाले, ''आम्‍हाला नवीन पोको सी७१ लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. हा डिवाईस पॉवर, परफॉर्मन्‍स व इनोव्‍हेशनचे प्रतीक आहे, बजेट स्‍मार्टफोन सेगमेंटमधील मर्यादांना दूर करत आहे. अतुलनीय दरामध्‍ये इंडस्‍ट्री-लीडिंग १२० हर्ट्झ डिस्‍प्‍ले, १२ जीबी डायनॅमिक रॅमची शक्‍ती आणि आधुनिक अँड्रॉइड १५ सह सी७१ वापरकर्त्‍यांना स्‍मार्टफोनमध्‍ये पाहिजे असलेल्‍या सर्व गोष्‍टी देतो, ज्‍यामध्‍ये कोणतीच तडजोड करत नाही.'' 

शक्तिशाली ऑक्‍टा-कोअर प्रोसेसरची शक्‍ती आणि १२ जीबी डायनॅमिक रॅम (६ जीबी+६ जीबी व्‍हर्च्‍युअल)सह पोको सी७१ जवळपास ३६ महिन्‍यांसाठी विनासायास कार्यरत राहतो. अँड्रॉइड १५ आऊट-ऑफ-द-बॉकससह सुस्‍पष्‍ट, विना-व्‍यत्‍यय अनुभव आणि सॉफ्टवेअर अपडेट्सच्‍या २+४ वर्षांचा आनंद घ्‍या, हे बजेट स्‍मार्टफोन श्रेणीमधील दुर्मिळ वैशिष्‍ट्य आहे. फक्‍त एवढेच नाही, अमूल्‍य क्षणांना कॅप्‍चर करायला आवडणाऱ्यांसाठी सी७१चा ३२ मेगापिक्‍सल ड्युअल रिअल कॅमेरा आणि ८ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा सर्व स्थितींमध्‍ये सुस्‍पष्‍ट व उच्‍च दर्जाचे फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍याची खात्री देतात. तसेच, या डिवाईसमध्‍ये ५२०० एमएएच बॅटरी आणि १५ वॅट फास्‍ट चार्जिंग आहे, ज्‍यामुळे दिवसभर विनासायास स्‍मार्टफोन वापरता येतो.


 


सी७१ ला इतरांपेक्षा वरचढ ठरवणाऱ्या बाबी कोणत्‍या?

•           सेगमेंटमधील सर्वोत्तम ६.८८ इंच एचडी+ १२० हर्ट्झ डिस्‍प्‍ले - टीयूव्‍ही राइनलँड ट्रिपल सर्टिफाईड आय प्रोटेक्‍शनसह अल्‍ट्रा-स्‍मूद, अल्‍ट्रा-सेफ.

•           स्‍लीक, स्‍टायलिश डिझाइन - फक्‍त ८.२६ मिमी जाडी, तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध: गोल्‍ड, ब्‍ल्‍यू आणि ब्‍लॅक.

•           सेगमेंटमधील एकमेव स्‍मार्टफोन, जो विनासायास मल्‍टीटास्किंगसाठी १२ जीबी रॅमसह अँड्रॉइड १५ आणि सिक्‍युरिटी अपडेट्सची २+४ वर्षे देतो.

•           ऑक्‍टा-कोअर प्रोसेसर आणि ३६ महिने विना-व्‍यत्‍यय अनुभव - मनोरंजन व उत्‍पादकतेसाठी पॉवर-पॅक.

•           ५२०० एमएएच बॅटरीसह १५ वॅट फास्‍ट चार्जिंग - दिवसभर कार्यरत राहण्‍यासह जलदपणे चार्ज होतो.

•           ३२ मेगापिक्‍सल ड्युअल कॅमेरा आणि ८ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा - आकर्षक, वास्‍तविक फोटो व व्हिडिओजना प्रभावीपणे कॅप्‍चर करतात.

•           आयपी५२ स्‍प्‍लॅश व डस्‍ट रेसिस्‍टण्‍स - सर्व स्थितींमध्‍ये टिकून राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. 

 

उपलब्‍धता आणि लाँच ऑफर्स: 

●          पोको सी७१ ४ जीब‍ी रॅम + ६४ जीबी स्‍टोरेज मॉडेलसाठी ६,४९९ रूपयांमध्‍ये आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्‍टोरेज मॉडेलसाठी ७,४९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध आहे, ज्‍यामुळे फ्लॅगशिप-लेव्‍हल वैशिष्‍ट्ये अधिक सहजसाध्य आहेत.

●          एक्‍सक्‍लुसिव्‍ह एअरटेल ऑफर: फक्‍त ५,९९९ रूपयांमध्‍ये पोको सी७१ खरेदी करा, ही ऑफर फक्‍त एअरटेल वापरकर्त्‍यांसाठी उपलब्‍ध आहे, तसेच स्‍पेशल फायदे १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता उपलब्‍ध असतील. 

●          तर मग, त्‍वरा करा आणि नवीन पोको सी७१ खरेदी करा फ्लिपकार्ट Link वर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.