*जयपुरिया ग्रुपकडून क्लिअरदेखोचे संपादन*
~ भारताचा सर्वांत मोठा आयवेअर ब्रँड उभारणार ~
*मुंबई, २३ एप्रिल २०२५:* भारतातील आघाडीचा परवडणारा चष्मा ब्रँड क्लिअरदेखो जयपुरिया ग्रुपने विकत घेतला आहे. तो किरकोळ विक्री, पेये (पेप्सी बॉटलर्स) आणि जागतिक ब्रँड भागीदारीमध्ये प्रबळ वारसा असलेला एक वैविध्यपूर्ण भारतीय समूह आहे. हे संपादन क्लिअरदेखोच्या राष्ट्रीय चष्म्यांचे पॉवरहाऊस बनण्याच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा असून प्रत्येक भारतीयासाठी उच्च दर्जाचे चष्मे उपलब्ध आणि वाजवी दरात बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
हे संपादन संपूर्ण खरेदी तत्त्वावर आहे. त्यात जयपुरिया ग्रुप बहुसंख्य मालकी ताब्यात घेईल आणि दोन वर्षांत सर्व विद्यमान भागधारकांची बाहेर पडण्याची शक्यता निश्चित करेल. अखेरीस ग्रुपकडे कंपनीचा १००% हिस्सा असेल. क्लिअरदेखो स्वतंत्र ब्रँड म्हणून काम करत राहील. परंतु आता हा व्यवसाय पूर्णपणे जयपुरिया ग्रुपद्वारे व्यवस्थापित केला जाईल आणि एक शिस्तबद्ध वाढ व विस्तार रोडमॅप तयार केला जाईल. व्यवसाय जसजसा वाढेल तसतसा तो समूहाच्या मूळ घटकात समाकलित केला जाईल.
ही भागीदारी विकासासाठी महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनासह येते. जयपुरिया ग्रुपचे रिटेल ज्ञान आणि कार्यान्वयनात्मक व्याप्तीच्या मदतीने क्लिअरदेखो पुढील तीन वर्षांत ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपले कामकाज आक्रमकपणे वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते. पाच ते सात वर्षांत भारताच्या चष्म्यांच्या बाजारपेठेतील किमान १०% हिस्सा काबीज करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. सकारात्मक व्यवसाय राखताना राष्ट्रीय ब्रँड तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. ब्रँडने एका वर्षात ८० ते १०० नवीन स्टोअर्स उघडण्याची त्यांची नजीकच्या काळातली योजना आधीच आखली आहे, सुरुवातीला उत्तर भारतात त्यांची उपस्थिती वाढवली जाईल आणि त्यानंतर देशाच्या पश्चिम व दक्षिणेकडील भागात धोरणात्मक विस्तार केला जाईल.
क्लिअरदेखोचे संस्थापक शिवी सिंग म्हणाले, "हे अधिग्रहण आमच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. अब्जावधी आणि त्याहून अधिक लोकांसाठी क्लिअरदेखो उभारण्याच्या आमच्या विश्वासाचे हे प्रतीक आहे. सीके जयपुरिया ग्रुपसोबत भागीदारी केल्याने आम्हाला प्रत्येक भारतीयासाठी दर्जेदार चष्मे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला साकार करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाण, कार्यान्वयनाची शक्ती आणि धोरणात्मक दिशा मिळेल. रिटेल आणि ब्रँड-बिल्डिंगची त्यांची सखोल समज आमच्या श्रेणीतील कौशल्यासोबत आल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठेतील ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक चांगली, जलद आणि अधिक कार्यक्षमतेने सेवा देता येईल."
जयपुरिया ब्रँड्सचे संचालक अनुराग जयपुरिया आणि रुचिरंस जयपुरिया म्हणाले की, “एकत्रितरित्या नवसंशोधन करून उभारणीसाठी आम्ही खूप उत्सुक आणि आतूर आहोत. तसेच या ताब्यामुळे क्लिअरदेखोला राष्ट्रीय ब्रँड म्हणून पुढे येण्यास मदत येईल याची आम्हाला खात्री वाटते. आमच्या जयपुरिया ब्रँड्झ पोर्टफोलिओअंतर्गत या संपादनाद्वारे आम्ही क्लिअरदेखोला पुढील स्तरावर घेऊन जाण्याचे, संपूर्ण भारतात तिचा विस्तार करण्याचे आणि परवडणाऱ्या आयवेअर रिटेलमध्ये नवीन मानके स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. आपल्या श्रेणीतील आघाडीवरील ब्रँड्सना जागा देण्याचे आमचे ध्येय आहे आणि क्लिअरदेखो चष्म्याच्या क्षेत्रात एक मजबूत दावेदार आहे.”