एकॉर आणि इंटरग्लोब यांच्यात आतिथ्याची नवीन व्याख्या करणारी महत्त्वपूर्ण भागीदारी
· भारतातील झपाट्याने वाढत चाललेली आतिथ्य बाजारपेठ काबिज करण्यासाठी दोन ऐतिहासिक भागीदारांमध्ये एक एकीकृत आणि स्वायत्त संघटना
· या भागीदारीचा उद्देश 2030 पर्यंत एकॉर ब्रँड अंतर्गत 300 हॉटेल्सच्या महत्त्वाकांक्षी नेटवर्कचे लक्ष्य ठेवून भारताच्या सर्वात जलद वाढणाऱ्या आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) व्यवसायाचे सर्जन करण्याचा आहे
मुंबई / पॅरिस – भारताच्या आतिथ्य क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, जागतिक आतिथ्य क्षेत्रातील आघाडीची कंपनी एकॉर आणि भारतातील आघाडीचा पर्यटन समूह इंटरग्लोब यांनी भारताच्या सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या हॉस्पिटॅलिटी एन्टरप्राइझचे सर्जन करण्यासाठी आपली भागीदारी अधिक दृढ केल्याची घोषणा केली, जे एक बेजोड नेटवर्क, ब्रॅंड्सचा एक पोर्टफोलियो आणि सर्व मार्केट सेगमेन्ट्समध्ये वितरण प्रदान करेल. भारतात वेगाने वाढत असलेला आतिथ्य बाजार काबिज करण्यासाठी आणि या उद्योगातील जागतिक नेत्यांची ताकद एकत्रित करण्याच्या महत्त्वाकांक्षेसह हा नवीन प्लॅटफॉर्म 2030 पर्यंत एकॉर ब्रॅंड अंतर्गत 300 हॉटेल्सच्या नेटवर्कचे लक्ष्य ठेवेल.
ताकदीवर आधारित एक धोरणात्मक युती
या ऐतिहासिक भागीदारीत प्रत्येक हितधारकाच्या अद्वितीय शक्ती सामावल्या आहेत:
· एकॉर एक आघाडीचा जागतिक आतिथ्य समूह आहे, ज्याने गेल्या काही वर्षांपासून भारतात एक प्रभावशाली उपस्थिती स्थापित केली आहे. सध्या त्यांची देशात 71 हॉटेल्स असून आणखी 40 विकासाच्या टप्प्यात आहेत. इकॉनॉमीपासून लक्झरी ब्रॅंड्सपर्यंत त्यांचा विस्तार आहे. या युतीच्या माध्यमातून एकॉर आपल्या फुटप्रिंटचा लक्षणीय विस्तार करेल आणि संचालन सुव्यवस्थित करेल, ज्यामुळे इकॉनॉमीपासून ते लाइफस्टाइल आणि लक्झरीपर्यंत सर्व क्षेत्रांत भारतीय बाजारात ठोस विकासाबाबतची त्यांची वचनबद्धता दृढ होईल.
· इंटरग्लोब एक आघाडीचा भारतीय समूह आहे, जो प्रवास आणि आतिथ्य या क्षेत्रात आपले बेजोड नैपुण्य प्रस्तुत करतो. तसेच, हवाई वाहतूक (इंडिगो), हॉटेल्स (भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर), एअरलाइन व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स, प्रवास आणि AI सक्षम टेक्नॉलॉजीत त्यांचा एक सिद्ध एंटरप्राइझ ट्रॅक रेकॉर्ड देखील आहे. इंटरग्लोब हा इंडिगो या भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइनचा सर्वात मोठा स्टेकहोल्डर आहे. इंडिगोकडे 400 एकरक्राफ्ट आहेत, जी 130 शहरांना रोज 2200 नियमित उड्डाणांमार्फत जोडतात. 2025 या आर्थिक वर्षात या एअरलाइनने 118 मिलियन प्रवाशांना आपल्या वांछित स्थानी पोहोचवले आहे. मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीत जगातील सर्वात जास्त मूल्याच्या एअरलाइनपैकी ही एक आहे.
भारताची आतिथ्याची क्षमता उघड करणे
· ~7% इतक्या GDP दराने वाढणारी अर्थव्यवस्था आणि 1.4 बिलियन लोकसंख्येसह भारत 2027 पर्यंत जगातील पाचवे सर्वात मोठे आउटबाउंड ट्रॅव्हेल मार्केट आणि तिसरे सर्वात मोठे डोमेस्टिक ट्रॅव्हेल मार्केट बनण्याच्या मार्गावर आहे. झपाट्याने वर येणारा मध्यमवर्ग, सुधारलेले इन्फ्रास्ट्रक्चर आणि वाढलेली हवाई कनेक्टिव्हिटी यामुळे देशांतर्गत पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात अभूतपूर्व वाढ झाली आहे, खास करून मध्य पूर्व आशिया पॅसिफिक मध्ये, जेथे एकॉर आघाडीचा हॉटेल संचालक आहे.
· भारतातील हॉटेल उद्योग खूप विस्कळित आहे. त्यामुळे येथे संघटित, ब्रॅंडेड कंपन्यांसाठी मोठी संधी आहे. इंटरग्लोबसोबत आपली दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी मजबूत करून भारताची संपूर्ण आतिथ्य क्षमता अनलॉक करण्याचे एकॉरचे ध्येय आहे. ज्यामुळे या क्षेत्रात मोठे परिवर्तन येईल आणि भारतीय प्रवाशांची देशातील गंतव्य स्थानांबरोबरच जगभरात सेवा करता येऊ शकेल.
एक धाडसी विस्तार धोरण
एकॉर आणि इंटरग्लोब यांच्यातील हा धोरणात्मक सहयोग खालील मुख्य उपक्रमांभोवती रचला आहे:
सर्व क्षेत्रांना सामावून घेणारे आतिथ्य केंद्र बनवणे
· एकॉर आणि इंटरग्लोब देशातील आपली स्वतःच्या मालकीची संपत्ती, विकास आणि व्यवस्थापन व्यवसायांना एकत्र आणून एक स्वायत्त, एकीकृत मंच बनवतील.
· हे नवीन युनिट भारतात एकॉरच्या सर्व ब्रॅंड्सना पुढे नेण्यासाठीचे एक विशेष माध्यम बनेल. यामध्ये एनिसमोरचे लक्झरी आणि लाइफस्टाइल ब्रॅंड एकॉरच्या झपाट्याने वाढणाऱ्या आतिथ्य पोर्टफोलियोमध्ये सामील आहेत.
· एकॉर संचालन आणि ब्रॅंड व्यवस्थापनाचे नेतृत्व करणे चालू ठेवेल आणि आपले ब्रॅंड्स आणि सेवांपर्यंत संपूर्ण पोहोच प्रदान करेल.
ट्रीबो सोबत विशेष भागीदारी
· ट्रीबो हा भारताच्या आघाडीच्या ब्रॅंडेड बजेट हॉटेलांच्या प्लॅटफॉर्मपैकी एक असून तो आपल्या अद्वितीय टेक्नॉलॉजी-प्रेरित दृष्टिकोनाच्या व कुशल वितरण प्रणालीच्या माध्यमातून 120 शहरांत 800 हॉटेल्सचे व्यवस्थापन करतो. एकॉर आणि इंटरग्लोब संयुक्तपणे गुंतवणूक करून ट्रीबो मधील सर्वात मोठे भागधारक बनतील. मास्टर लायसन्स कराराच्या माध्यमातून भारतात आयबिस आणि मर्क्योर ब्रॅंड्स विकसित करण्यासाठी ट्रीबो पुढाकार घेईल.
· या भागीदारीअंतर्गत, ट्रीबोने दहा नवीन मर्क्योरसाठी स्वाक्षरी करण्यासाठी विविध मालमत्ता मालकांशी एक करार केला आहे, जो भारतात ब्रॅंडच्या विस्तारातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
· एकॉरचे ब्रॅंड भारतातील विशाल अनब्रॅंडेड हॉटेल मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी ट्रीबो च्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा फायदा घेतील. एकॉर आणि ट्रीबो यांचा संयुक्त पोर्टफोलियो भारतातील तिसरी सर्वात मोठी आतिथ्य कंपनी बनवेल, ज्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त खोल्या असतील.