Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इंजिनच्‍या ग्‍लोबल फॅशन व्हिजनचे भारतात पदार्पण

 इंजिनच्‍या ग्‍लोबल फॅशन व्हिजनचे भारतात पदार्पण



मुंबई, ९ एप्रिल २०२५: इंजिन हा प्रीमियम मेन्‍सवेअर ब्रँड भारतात लाँच होण्‍यास सज्‍ज आहे, जो लक्‍झरी फॅशनमधील किफायतशीरपणाला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल. ज्ञानप्रकाश, कार्तिकेयन के., कार्तिकेयन पी., रमेश कुमार आणि दिनेश डी. यांनी स्‍थापना केलेला ब्रँड भारतातील ग्राहकांना जागतिक डिझाइन क्षमता व कारागिरीचा अनुभव देतो. गतकाळात डिझेल व गेस यांसारख्‍या जागतिक कंपन्यांशी संलग्‍न असलेल्‍या संस्‍थापकांना कमतरता दिसून आली, ती म्‍हणजे किफायतशीर दरांमध्‍ये प्रीमिमय दर्जाचे मेन्‍सवेअर, ज्‍यामधून त्‍यांना इंजिनची स्‍थापना करण्‍यास प्रेरणा मिळाली.

बेंगळुरूमध्‍ये मुख्‍यालय असलेले इंजिन आपले स्प्रिंग-समर २०२५ कलेक्‍शन लाँच करणार आहे, ज्‍यामध्‍ये बारकाईने डिझाइन केलेल्‍या आवश्‍यक वॉर्डरोबचा समावेश आहे. हे कलेक्‍शन प्रीमियम सुपिमा कॉटन्‍स आणि सुपिमा ब्‍लेण्‍ड यार्न्‍सचा वापर करत डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून अपवादात्‍मक कोमलता, टिकाऊपणा आणि आरामदायीपणाची खात्री मिळते. या कलेक्‍शनमध्‍ये प्रीमियम टेक्‍स्‍चर्सच्‍या श्रेणीसह मिस-जर्सी, मायक्रो-पिक, इंटरलॉक, जॅक्‍वार्ड आणि क्रॉस-लूप फ्रेंच टेरी यांचा समावेश आहे. हा प्रत्‍येक पीस अद्वितीय फील व परफॉर्मन्‍ससाठी निवडण्‍यात आला आहे. अत्‍याधुनिक प्रिंटिंग तंत्रे आणि सुधारित भरतकाम यांसह हे गारमेंट्स आंतरराष्‍ट्रीय आकर्षकता व दर्जा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

डिजिटल फर्स्‍ट व डी२सी (डायरेक्‍ट-टू-कंझ्युमर) मॉडेलसह इंजिन दर्जा व किमतीसंदर्भात परिपूर्ण नियंत्रणाची खात्री देते. हे कलेक्‍शन फक्‍त ब्रँडच्‍या ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्‍ध असेल, तसेच मोबाइल अॅप लवकरच अँड्रॉइड व आयओएससाठी लाँच करण्‍यात येणार आहे.  

ब्रँड भारतातील मेन्‍सवेअर बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण करण्‍यास सज्‍ज असताना टीम प्रीमियम दर्जा अधिक सहजसाध्‍य करण्‍याच्‍या मिशनमधून प्रेरित आहे. संचालक कार्तिकेयन के. या दृष्टिकोनावर भर देत म्‍हणाले, ''इंजिन ब्रँड फक्‍त फॅशनपुरता मर्यादित नसून महत्त्वाकांक्षांना नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. प्रीमियम दर्जा विशेषाधिकार नाही तर निवड असला पाहिजे.'' कारागिरी आणि किफायतशीरपणावर लक्ष केंद्रित करत ब्रँडचा उद्योगामधील दीर्घकालीन तफावत दूर करण्‍याचा मनसुबा आहे. 




प्रीमियम डिझाइन्‍स प्रदान करण्‍याव्‍यतिरिक्‍त इंजिन आपल्‍या व्‍हर्टिकली एकीकृत उत्‍पादन सुविधेच्‍या माध्‍यमातून अपवादात्‍मक दर्जा नियंत्रण वितरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. संचालक दिनेश डी. या स्‍पर्धात्‍मक फायद्याला निदर्शनास आणत म्‍हणाले, ''आमच्‍या स्‍वत:च्‍या मालकीची व्‍हर्टिकली एकीकृत उत्‍पादन सुविधा असल्‍याने आम्‍हाला अद्वितीय फायदा मिळाला आहे. आम्‍ही फॅब्रिकची निवड करण्‍यापासून शेवटच्‍या स्टिचिंगपर्यंत प्रत्‍येक पावलावर नियंत्रण ठेवतो, ज्‍यामुळे आम्‍हाला किफायतशीर दरामध्‍ये लक्‍झरी कारागिरी वितरित करता येते. प्रत्‍येक इंजिन गारमेंटच्‍या दर्जाची तीनपट किंमत असलेल्‍या कपड्यांप्रमाणेच तपासणी केली जाते.'' अचूकतेचा हा स्‍तर राखत ब्रँड खात्री देतो की, प्रत्‍येक उत्‍पादन उच्‍च मापदंडांची पूर्तता करते.

इंजिनची प्रभावकांसोबतचा सहयोग आणि डायनॅमिक सोशल मीडिया उपक्रमांच्‍या माध्‍यमातून शहरी मिलेनियल्‍स व स्‍टाइलप्रती जागरूक व्‍यावसायिकांचे लक्ष वेधून घेण्‍याची योजना आहे. डिस्‍पोजेबल/फास्‍ट फॅशन ट्रेण्‍ड्सपेक्षा स्‍वत:ला वेगळे ठरवत कंपनी आकर्षक स्‍टाइल्‍स डिझाइन करण्‍यावर लक्ष केंद्रित करते, ज्‍यांची प्रखर वेअर चाचणी केली जाते आणि ते ग्राहकांना दीर्घकाळापर्यंत दर्जाची खात्री देतात.

ब्रँडच्‍या रोडमॅपमध्‍ये पुढील सीझनपर्यंत शर्टस्, चिनोज, जॅकेट्स व डेनिमसह आपल्‍या कलेक्‍शनमध्‍ये विविधता आणण्‍याचा समावेश आहे. इंजिन सीमांपलीकडे देखील शिपिंग करण्‍याची क्षमता पाहते, जेथे जगभरात भारतीय कारागिरीचे प्रदर्शन दाखवते, तसेच किफायतशीर दरांमध्‍ये अपवादात्‍मक दर्जा देण्‍याच्‍या आपल्‍या संस्‍थापकीय तत्त्वांशी बांधील राहते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.