Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*माझ्या आहारात दही नेहमी असतंच - वल्लरी विराज*

*माझ्या आहारात दही नेहमी असतंच - वल्लरी विराज*

*सेटवर आल्यावर मी नारळपाणी पिते*



मराठी टेलिव्हिजनवरचं लाडकं पात्र म्हणजेच *'नवरी मिळे हिटलरला'* मालिकेतील लीला, *लीला* म्हणजेच *वल्लरी* आपल्या खऱ्या आयुष्यात आपल्या आहाराची काळजी कशी घेते हे आज जाणून घेऊया. 'कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली किंवा केली तर कधी त्रास नाही होत. एखादा सण आला  कि मी गोड खाते जसं, दिवाळी मध्ये मी करंजी खाते कारण मला ती आवडते पण प्रमाणात. कारण मला असं वाटतं की आपल्याला काही खायची इच्छा झाली आणि ते नाही खाल्ले तर ती इच्छा वाढत जाते. आता आंब्याचा सीजन आहे तर मी त्याचा पण आस्वाद घेणार पण प्रमाणात. जेव्हा तुम्ही या गोष्टी खाता तेव्हा वर्कआउट ही विसरू नका. तुम्ही जेव्हा छान खाता तेव्हा तुमचा मूड ही छान राहतो आणि माझ्या बाबतीत हे खरं आहे. जेव्हा मी नीट जेवत नाही, तेव्हा माझा मूड खराब असतो.  माझ्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होतो. पण त्याच जागी जेव्हा मी काही छान खाल्ले कि माझा मूड उत्तम असत आणि काम करण्याची ऊर्जा वाढते. जर माझ्या दिवसाच्या आहारा बद्दल सांगायचे झाले तर मी सकाळी उठून आधी गरम पाणी पिते, त्यानंतर एक फळ, कॉफी आणि नाष्ट्या मध्ये ओट्स, पोहा, उपमा किंवा डोसा असे खाऊन दिवसाची सुरवात करते आणि सेटसाठी निघते. सेटवर मी दुपारच्या जेवणात एक भाकरी, भाजी आणि कोशिंबीर किंवा सलाड असत, भात मी टाळते, पण दुपारच्या जेवणात मी दही खाते मला ते आवडत आणि ते पचनासाठी आणि त्वचेसाठी ही चांगलं असत. ५ वाजता मला थोडी भूक लागते तेव्हा मी ब्लॅक कॉफी, एक तुकडा डार्क चॉकलेट किंवा ड्रायफ्रुटस, किंवा खाल्ले तर  काकडी- गाजर खाते. ७ वाजता मी माझं डिनर करते त्यात कधी मी पोळी-भाजी किंवा सलाड किंवा ग्रिल्ड चिकन खाते. रात्री झोपायच्या आधी मी गरम पाणी पिते. आता गर्मी सुरु आहे त्यामुळे मी नारळपाणी पिते. 



*गर्मीत तुमच्या आहारात काय खात आहात त्यावर लक्ष द्या आणि तुमच्या आवडत्या 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत ही काय ट्विस्ट येत आहेत ते बघायला विसरू नका दररोज रात्री ११ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.