नवीन लोगोसहित एस्स्के ब्यूटीचे रिब्रँडिंग
मुंबई, ९ एप्रिल २०२५: एस्सके ब्यूटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या भारतातील आघाडीच्या सलून ग्रोथ एक्सपर्ट कंपनीने हेअर अॅण्ड ब्यूटी शो इंडियामध्ये (एचबीएस) आपला ठसठशीत आणि नवीन लोगो अनावरण केला. ‘व्हिजन २०३०’ या आपल्या भविष्यमूल्यांकित आराखड्यानुसार जागतिक पातळीवर विकास व नवकल्पनांसाठी कंपनीने ही एक नवी सुरुवात केली आहे.
नवीन डिझाईन केलेला ब्रँड हा ‘एस्सके ब्यूटी’च्या अधिक रचनात्मक, सेवा-केंद्रित प्रवासाचे प्रतिबिंब आहे. लोगोतील पार्श्वभूमीचा गडद व समृद्ध रंग, त्यावर बेज रंगाची सौम्य छटा ही रंगसंगती आकर्षकपणा व आपुलकी यांचा समन्वय दाखवते. लोगोमधील हृदयाच्या आकारातील रेषा ही काळजी आणि परिवर्तन दर्शविते, तर स्टायलाइज्ड चेकमार्क हा गुणवत्ता आणि विश्वास यांचे प्रतीक आहे. हे सर्व गुणधर्म गेल्या दोन दशकांपासून या कंपनीच्या परंपरेचे सार आहेत.
“एचबीएस इंडिया येथे नवीन ओळख सादर करणे हा आमचा उत्साह जगासमोर मांडण्यासाठीचा सर्वोत्तम क्षण ठरला,” असे ‘एस्सके ब्यूटी रिसोर्सेस’चे संचालक अंकित विरमानी सांगितले. “हा लोगो केवळ दृष्यात्मक बदल नाही, तर आमची ओळख आणि आमचा प्रवास कुठे चालला आहे याचे प्रतिबिंब आहे. जागतिक स्तरावर विस्तार करताना आणि भागीदारी अधिक बळकट करताना, हे रिब्रँडिंग आम्हाला अधिक लवचिक आणि सेवा-केंद्रित संघटना बनण्याच्या दिशेने नेणारे आहे. काळजीचे प्रतीक असलेले हृदय आणि विश्वासाचे प्रतीक असलेला चेकमार्क या अशा प्रत्येक तपशीलातून, ‘आम्ही एकत्रितपणे यशाकडे वाटचाल करत आहोत’, हे दर्शविलेले आहे.”
ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी कंपनीने नवीन शैक्षणिक उपक्रम व सलून्सना विस्तारित सहाय्य यांचा समावेश असलेली रणनीती राबवली आहे. त्यामुळे सलून या कंपनीकडून केवळ उत्पादने खरेदी करीत नाहीत, तर ती या ब्रँडसोबत वाढतात. आपला पोर्टफोलिओ अधिक व्यापक करण्यासाठी एस्सकेने दोन नवीन विभाग सुरू केले आहेत. यातील ‘एलिट’ हा प्रीमियम ब्रँड्सवर लक्ष केंद्रित करणारा विभाग असून त्यात रिका, मिस्टर बार्बर, ओला कँडी, वॅक्सो, स्किनोरा हे ब्रॅंड येतात. ‘लक्झ’ हा विभाग लक्झरी ब्रँड्ससाठी आहे. यात कॅस्मारा, रिका हेअरकेअर, ओलिव्हिया गार्डन, मॅकॅडेमिया यांचा समावेश होतो. या विभागणीमुळे कंपनीचे कामकाज अधिक सुसंगत होत आहे.
‘एस्सके ब्यूटी रिसोर्सेस’चे संचालक शुभम विरमानी म्हणाले, “हे रिब्रँडिंग म्हणजे आमच्या सलून भागीदारांप्रती आम्ही नव्याने दिलेला वचनबद्धतेचा शब्द आहे, कारण ही सलून्स आमचे केवळ वितरक नाहीत, तर आमच्या यशातील कटिबद्ध भागीदार आहेत. आमची टीम प्रत्यक्ष क्षेत्रात काम करत असून, उत्पादनांसह शिक्षण, प्रशिक्षण आणि तात्काळ सल्ला देत आहे. सलूनना यशस्वी होण्यासाठी सक्षम बनवणे, त्यांचा विस्तार साधणे आणि त्यांच्या यशात सहभागी होणे, हा आमचा उद्देश आहे. जागतिक विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत असतानाही आम्ही आमच्या या मूळ उद्देशाशी घट्ट जोडलेले आहोत.”
२००२ मध्ये स्थापन झालेली एस्सके ब्यूटी कंपनी आज ३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये कार्यरत असून २२,००० हून अधिक सलून भागीदारांशी व्यवहार करीत आहे. रिका वॅक्स, कॅस्मारा यांसारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने भारतात आणण्यापासून ते स्किनोरा आणि मिस्टर बार्बरसारख्या इन-हाउस ब्रँड्सच्या निर्मितीपर्यंत, ‘एस्सके’ने व्यावसायिक ब्यूटी क्षेत्र घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.