Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबईत फेडएक्सची इलेक्ट्रिक वाहनांद्वारे डिलिव्हरी सेवा

 मुंबईत फेडएक्सची इलेक्ट्रिक वाहनांद्वारे डिलिव्हरी सेवा


मुंबई, ८ एप्रिल २०२५: फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (“फेडएक्स”) ही जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट कंपनी मुंबईत लास्ट-माइल डिलिव्हरीसाठी अतिरिक्त इलेक्ट्रिक वाहने (इव्ही) तैनात करून भारतात शाश्वत लॉजिस्टिक्सचे प्रमाण वाढवत आहे. अलीकडेच मुंबईत दाखल केलेल्या १३ टाटा एस इव्हीसह दिल्ली, बंगळूर सहितच्या प्रमुख भारतीय शहरांत कंपनीसाठी कार्यरत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या ५९ वर पोहोचली आहे. हे प्रयत्न २०४० पर्यंत जागतिक स्तरावर कार्बन-न्यूट्रल ऑपरेशन्स साध्य करण्याच्या फेडएक्सच्या लक्ष्याशी सुसंगत आहेत. तसेच जगभरात अधिक शाश्वत पुरवठा साखळी सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

शाश्वतता आणि ब्रॅंड सिनर्जीची सांगड घालण्याच्या प्रयत्नात फेडएक्सने मुंबई, दिल्ली आणि बंगळूर मध्ये फेडएक्स-सीएसके को-ब्रॅंडेड इव्ही सुरू केल्या आहेत आणि जबाबदारीपूर्वक वस्तू पोहोचवण्याची आपली वचनबद्धता बळकट केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अधिकृत पार्टनर म्हणून हा उपक्रम वेग, नेमकेपणा आणि उत्कृष्टता या गुणांवर उभ्या असलेल्या दोन ब्रॅंडमधील दमदार संगतीचे प्रतिनिधित्व करतो. ही को-ब्रॅंडेड वाहने भारतातील कंपनीची उपस्थिती वाढवतात आणि मार्केटमधील त्यांची सध्या असलेली गुंतवणूक अधिक मजबूत करतात.




फेडएक्सच्या इंडिया ऑपरेशन्स आणि प्लॅनिंग आणि इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष सुवेंदू चौधरी म्हणाले, “फेडएक्स ही पहिली जागतिक डिलिव्हरी कंपनी होती, जिने २००३ मध्ये हायब्रिड इलेक्ट्रिक वाहने दाखल केली होती, तर बॅटरी-संचालित वाहनांचा आमचा प्रवास तर त्याही आधी १९९४ मध्ये सुरू झाला होता. हीच परंपरा पुढे नेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि भारतात शाश्वत लॉजिस्टिक्सला चालना देण्यात भूमिका बजावताना आम्हाला अभिमान वाटत आहे. टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याच्या आमच्या व्यावहारिक दृष्टिकोनासह आमच्या ग्राहकांना सेवा प्रदान करत असतानाच कार्बन उत्सर्जन कमीत कमी करण्याची काळजी आम्ही घेत आहोत.”

इलेक्ट्रिक वाहने स्मार्ट, स्वच्छ आणि कार्यक्षम सोल्यूशन्स प्रदान करून लॉजिस्टिक्स क्षेत्रात क्रांती घडवत आहेत. कार्बन उत्सर्जन आणि हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या पलीकडे जाऊन ही वाहने शाश्वत व्यावसायिक पद्धतींसाठी उपभोक्त्यांची वाढती पसंती मिळवत आहेत. शाश्वततेसाठीच्या उपभोक्त्यांच्या अपेक्षा वाढत आहेत. फेडएक्सने केलेल्या एका संशोधना त असे दिसून आले आहे की, ९०% भारतीय उपभोक्ते अशा व्यवसायांना प्राथमिकता देत आहेत, ज्या व्यवसायांत शाश्वत पद्धतींना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे इव्हीचा अंगिकार करण्यात एक धोरणात्मक फायदा देखील दडलेला आहे. आपल्या इव्ही वाहनांचा ताफा वाढवण्याचे धोरण चालू ठेवून फेडएक्स अशा स्मार्ट, जबाबदार लॉजिस्टिक्स सोल्यूशन्सना चालना देत आहे, जी सोल्यूशन्स भारतातील पुरवठा साखळीच्या बदलत्या गरजा भागवताना पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव करतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.