‘कापडिया हॉस्पिटल’ची ‘मिस्सो' प्रणालीसह अस्थिरोग शस्त्रक्रियेत क्रांती
मुंबई, ३ एप्रिल २०२५: कापडिया हॉस्पिटल’ने गुढघा बदल शस्त्रक्रियेसाठी भारतात रचना झालेली मिस्सो (एमआयएसएसओ) ही प्रगत रोबोटिक प्रणाली स्थापित करुन आपल्या अस्थिरोग शुश्रूषा अधिक उत्तम बनवली आहे. मुंबईत प्रथमच स्थापित झालेल्या या मिस्सो प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया नैपुण्य यांचा संगम असून त्यामुळे शस्त्रक्रियेत उच्च अचूकता येते, रुग्ण जलद बरा होतो आणि लोकांना दर्जेदार आरोग्यसुरक्षा मोठ्या प्रमाणात प्राप्त करता येते.
पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलेली ‘मिस्सो’ प्रणालीची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चलित अचूकता व किमान छेदन दृष्टीकोनामुळे रुग्ण जलद बरे होण्यास तसेच शस्त्रक्रियांची सुधारित फलिते मिळण्यास मदत होते. केंद्रीय उद्योग व पुरवठा मंत्री मा. श्री. पियूष गोयल यांच्या हस्ते सादर झालेल्या मिस्सो प्रणालीने रोबोटिक सांधेबदलात गुणवत्तेचा नवा मापदंड स्थापित केला आहे.
‘मिस्सो’ची रचना व निर्मिती भारतात झाली असून त्यात शस्त्रक्रियांचे त्रिमित मापन (थ्री डी मॅपिंग) करण्यासाठी प्रगत संगणन (ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) व तत्काळ माहितीसाठा (रिअल-टाइम डाटा) यांचा वापर केला जातो ज्यामुळे शल्यविशारदांना अचूक छेद घेण्यास व रोपण करण्यास मार्गदर्शन होते. प्रणालीतील सिक्स-जॉइंट रोबोटिक आर्म, ट्रॅकिंग कॅमेरा व सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे तत्काळ सुधारणा करता येतात आणि सांध्यांची स्थिर व नैसर्गिक हालचाल साध्य होते. किमान छेदन (मिनीमल इन्व्हेजन) दृष्टीकोनामुळे उतिंचे (टिश्यू) नुकसान, रक्तस्त्राव व बरे होण्याचा कालावधी कमी होतो आणि रुग्णांना वेगाने दैनंदिन जीवन सुरळित जगण्यास मदत होते. आत्मनिर्भर भारत धोरणाशी संलग्न असलेली मिस्सो प्रणाली वैद्यकीय तंत्रज्ञानातील भारताच्या अभिनवतेचे प्रतिक असून त्यामुळे जागतिक दर्जाच्या रोबोटिक शस्त्रक्रिया लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोचू शकतील.
‘कापडिया हॉस्पिटल’चे रोबोटिक नी अँड शोल्डर सर्जन डॉ. राहुल मोदी म्हणाले, “मिस्सो प्रणालीने अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व शस्त्रक्रिया नैपुण्याचा संगम घडवून भारतातील अस्थिरोग शस्त्रक्रियांची नवी व्याख्या रचली आहे. या स्वदेशी रोबोटिक प्रणालीमुळे अचूकता प्राप्त होते, रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होतो, शस्त्रक्रियेची फलिते सुधारतात आणि रुग्णांना खूप आराम मिळून पुन्हा हालचाल करणे जलद शक्य होते. वैद्यकीय तंत्रज्ञानातील या क्रांतीमुळे रुग्ण शुश्रूषेच्या गुणवत्तेचा मापदंड उंचावला गेला आहे व अत्याधुनिक अस्थिरोग उपचार अधिक प्रभावी व अधिक लोकांपर्यंत पोचणारे झाले आहेत.”
‘कापडिया हॉस्पिटल’चे संस्थापक, मालक व कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. राजन मोदी म्हणाले, “मिस्सो प्रणालीच्या बहुगुणांमुळे ती आगळी ठरते आणि आम्हाला विविध अस्थिरोग शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने करणे शक्य होते. पारंपरिक रोबोटिक प्रणालींच्या तुलनेत मिस्सो प्रणाली शस्त्रक्रिया कार्यप्रवाहांचे सुसूत्रीकरण करते व विविध प्लॅटफॉर्म वापरण्याची गरज न उरता रुग्णालय साधनसंपत्तीचा कुशल वापर घडवते. डेकेअर नी रिप्लेसमेंट सर्जरींचा समावेश केल्याने रुग्ण लवकर बरे होणे, उच्च कार्य़क्षमता, सुधारित संपर्क, रुग्ण शुश्रूषा दर्जाचे नवे मापदंड यासारखी वैशिष्ट्ये आता आम्ही देऊ शकतो.”