आयपीआरएसने वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO) च्या सहयोगाने बौद्धिक संपदा संवादासाठी जागतिक आणि भारतीय सर्जनशील व्यक्तींना एकत्र आणले
मुंबई, 11एप्रिल 2025 : भारताच्या मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगासाठी एका ऐतिहासिक क्षणात, इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी लिमिटेड (IPRS) ने वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO) च्या डिप्टी डायरेक्टर जनरल, सिल्वी फॉर्बिन यांच्या भारतातील पहिल्या अधिकृत दौऱ्यानिमित्त मुंबईत एका खास बंद-द्वार चर्चा सत्राचे आयोजन केले. या उच्चस्तरीय चर्चासत्रात भारताच्या संगीत आणि मनोरंजन उद्योगातील आघाडीचे सर्जक, गीतकार, संगीतकार, पटकथालेखक, म्युझिक लेबल्स, प्रकाशक, कायदेतज्ज्ञ, उद्योग संघटना आणि धोरणकर्ते सहभागी झाले होते. या संवादाचा उद्देश सर्जनशीलतेचे संरक्षण, नवोपक्रमाला चालना देणे आणि एआय व डिजिटल परिवर्तनाच्या युगात बौद्धिक संपदा अधिकारांचे (IPR) महत्त्व अधोरेखित करणे हा होता.
या सत्राचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध गीतकार, कवी, लेखक आणि IPRS चे चेअरमन श्री जावेद अख्तर यांनी भूषवले. हे सत्र जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व अधोरेखित करणारे एक रणनीतिक व्यासपीठ ठरले. या चर्चेने केवळ अधिकारांचे संरक्षण नव्हे, तर शाश्वत सर्जनशील अर्थव्यवस्था घडवण्यासाठी सक्षम IP प्रणालीची गरज अधोरेखित केली.
"संगीत उद्योग नेहमीच तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या अग्रभागी राहिला आहे. या उद्योगाने वेळोवेळी आलेल्या तांत्रिक आव्हानांना सामोरे जात एकजूट दाखवली आहे. भारतात एआय क्रांतीसंदर्भात असलेली जागरूकता आणि तयारी पाहून मी खूप प्रभावित झाले आहे. भारतीय सर्जकांबरोबर आम्ही धोरणात्मक, व्यावसायिक आणि तांत्रिक उपाय पुढे नेण्यासाठी तयार आहोत. भारतीय संगीताच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा!" – सिल्वी फॉर्बिन, डिप्टी डायरेक्टर जनरल, वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (World Intellectual Property Organization)
"ही चर्चा केवळ अधिकार आणि रॉयल्टीपुरती मर्यादित नव्हती. ही त्या सर्जकांच्या ओळखीबद्दल आणि सन्मानाबद्दल होती जे प्रत्येक सांस्कृतिक कथानकाच्या मुळाशी असतात. WIPO सोबतच्या या संवादाद्वारे आमचा उद्देश न्याय्य मोबदला, कॉपीराइट अंमलबजावणी आणि भविष्यातील नीतिमत्तेवर चर्चा अधिक दृढ करणे हा होता—विशेषतः एआय आणि डिजिटल परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर. IPRS प्रत्येक सर्जनशील आवाजाला ऐकले जावे, त्याचा सन्मान व्हावा आणि त्याला त्याचा हक्क मिळावा, यासाठी कटिबद्ध आहे." – श्री जावेद अख्तर, चेअरमन, IPRS
"WIPO च्या डिप्टी डायरेक्टर जनरल, सुश्री सिल्वी फॉर्बिन यांच्या उपस्थितीत हे चर्चासत्र घडवून आणल्याबद्दल आम्ही जावेद अख्तर साहेब आणि IPRS चे आभार मानतो. ही एक अत्यंत मौल्यवान चर्चा होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मांडला गेला आणि विविध हितधारकांनी सर्जकांच्या हक्कांबाबत आपले विचार मांडले. लेखक आणि गीतकारांच्या संस्था म्हणून SWA आणि SRAI सर्जकांच्या हक्कांसाठी नेहमीच सक्रिय आहेत आणि अशा चर्चा अत्यंत उपयुक्त ठरतात." – ज़मां हबीब, जनरल सेक्रेटरी, स्क्रीनरायटर्स असोसिएशन (SWA)
"IPRS द्वारे या अनोख्या चर्चासत्राचे आयोजन हे एक प्रशंसनीय पाऊल होते. सुश्री सिल्वी फॉर्बिन आणि भारतातील विविध संगीत व मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांबरोबर चर्चा करणे हा एक अमूल्य अनुभव होता. भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी IPRS चा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे." – श्रीधर जे. स्वामिनाथन, सेक्रेटरी, SIMCA
प्रमुख सहभागींमध्ये हे मान्यवर उपस्थित होते: श्री राकेश निगम – CEO, IPRS; ब्लेज़ फर्नांडिस – प्रेसिडेंट व CEO, IMI; ज़मां हबीब – जनरल सेक्रेटरी, SWA; श्रीधर जे स्वामिनाथन – सेक्रेटरी, SIMCA; संजय टंडन – CEO, ISAMRA; अतुल चुरमानी – फाउंडर व एमडी, टर्नकी म्युझिक; दिनराज शेट्टी – एमडी, सोनी म्युझिक पब्लिशिंग; विपिन मिश्रा – MCAI; अमित दत्ता – फाउंडर, ADP Law; सलीम मर्चंट – गायक व दिग्दर्शक; कौसर मुनीर – गीतकार व कवयित्री; स्नेहा खनवलकर – संगीतकार; विशाल ददलानी – गायक व संगीतकार; लोहिता सुजिथ – MPA; विनोद रंगनाथन – CEO, SRAI आणि इतर मान्यवर उपस्थित होते.